मराठी बातम्या /बातम्या /देश /धक्कादायक! शरीराचे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले अन् शीर फेकलं, हत्येमागचं कारण वाचून बसेल धक्का

धक्कादायक! शरीराचे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले अन् शीर फेकलं, हत्येमागचं कारण वाचून बसेल धक्का

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

आरोपीने महिलेची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले. फ्रीजमध्ये ठेवले आणि शीर मात्र बॅगेत भरून कचऱ्यात फेकून दिलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Hyderabad, India

हैदराबाद : पैशांच्या व्यवहारात क्लीअर राहावं असं नेहमी सांगितलं जातं, मात्र काही वेळा उसने दिलेले किंवा व्याजानं दिलेल्या पैशांवरुन वाद झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. व्याजानं दिलेले पैसे परत मागितले म्हणून महिलेचा काटा काढला. आरोपीने महिलेची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले. फ्रीजमध्ये ठेवले आणि शीर मात्र बॅगेत भरून कचऱ्यात फेकून दिलं.

या संपूर्ण घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका स्वच्छता कर्मचाऱ्याला या महिलेचं धडावेगळं केलेलं मुंडकं दिसलं आणि त्याने तातडीने पोलिसांना आ संपूर्ण घटनेची माहिती दिली.

लग्नाच्या 27 वर्षांनंतर पत्नीचे 'पर्सनल लाइफ' बनले पतीसाठी जीवघेणे, नेमकं प्रकरण काय?

पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्या झालेल्या महिलेचं नाव येरम अनुराधा रेड्डी आहे ती 55 वर्षांची होती. 48 वर्षांच्या चंद्र मोहनसोबत या महिलेचे अनैतिक संबंध होते.

अनुराधा या आपल्या पतीपासून 15 वर्षांपूर्वी वेगळ्या झाल्या. त्यानंतर त्यांची ओळख चंद्र मोहनसोबत झाली. दोघांचंही एकमेकांशी चांगलं पटायला लागलं. अनुराधा या लोकांना व्याजाने पैसे द्यायच्या. त्यांनी चंद्र मोहनला देखील सात लाख रुपये व्याजाने दिले होते.

ट्रक पलटी झाल्याची माहिती मिळताच पोहोचले पोलीस, पण घटनास्थळी धक्कादायक माहिती समोर...

यावरुन त्या दोघांमध्ये नेहमी वाद होत असे. त्या चंद्र मोहनकडे दिलेले पैसे परत करण्याची मागणी करत होत्या. यातून सतत खटके उडायला लागले. अखेर चंद्र मोहननेच त्यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. चाकूने हल्ला केला आणि मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले. 15 मे रोजी आरोपीने महिलेचं शीर बॅगेत भरून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकलं.

First published:
top videos

    Tags: Hyderabad