मराठी बातम्या /बातम्या /देश /कशी होते व्हेगन दुधाची निर्मिती; Vegan Milk निर्मितीकडे वळण्याचा ‘पेटा’चा 'अमूल'ला सल्ला

कशी होते व्हेगन दुधाची निर्मिती; Vegan Milk निर्मितीकडे वळण्याचा ‘पेटा’चा 'अमूल'ला सल्ला

देशातील 100 दशलक्ष दुग्धोत्पादक शेतकरी आहेत, त्यापैकी 70 टक्के भूमिहीन आहेत. व्हेगन दुधाकडे वळल्यास त्यांना उदरनिर्वाहाचे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे साधन मिळणार आहे का?

देशातील 100 दशलक्ष दुग्धोत्पादक शेतकरी आहेत, त्यापैकी 70 टक्के भूमिहीन आहेत. व्हेगन दुधाकडे वळल्यास त्यांना उदरनिर्वाहाचे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे साधन मिळणार आहे का?

देशातील 100 दशलक्ष दुग्धोत्पादक शेतकरी आहेत, त्यापैकी 70 टक्के भूमिहीन आहेत. व्हेगन दुधाकडे वळल्यास त्यांना उदरनिर्वाहाचे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे साधन मिळणार आहे का?

  देशातील श्वेतक्रांतीला चालना देणारी आघाडीची सहकारी दुग्धोत्पादक कंपनी म्हणून अमूल (Amul) ओळखली जाते. लाखो लोकांना रोजगाराचं साधन निर्माण करून देण्यात कंपनीचा मोलाचा वाटा आहे. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ लिमिटेडतर्फे अमूल सहकारी संस्था चालवली जाते.

  सध्या अमूल एका नव्या वादात अडकली आहे. पेटा इंडिया (PETA India) या प्राणीप्रेमींच्या संस्थेनं कंपनीला व्हेगन दूध (Vegan Milk) म्हणजेच वनस्पतीजन्य दूध निर्मिती करण्याचा सल्ला दिला आहे. त्यावरून लोकांसाठी वनस्पतीजन्य म्हणजे व्हेगन की प्राणीजन्य दूध उत्तम याबाबत अमूल आणि पेटा यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला आहे.

  पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स (PETA) इंडियानं अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. सोधी (R. S. Sodhi) यांना एक पत्र लिहून व्हेगन दूध निर्मिती करण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितलं आहे. ‘देशात व्हेगन खाद्यपदार्थ आणि दूध यांना मागणी वाढत आहे. त्याचा फायदा दुग्धोत्पादन क्षेत्रातील सहकारी संस्थांना मिळाला पाहिजे. वनस्पतीजन्य उत्पादनांची मागणी वाढत असल्याचा फायदा अमूलनं घ्यावा, अशी आमची इच्छा आहे. या क्षेत्रातील अन्य कंपन्या बाजारात होत असलेल्या बदलांना प्रतिसाद देत आहेत. अमूलनंदेखील या बदलांचा स्वीकार करून आपल्या उत्पादनात बदल करावा,’ असं पेटा इंडियानं या पत्रात म्हटलं आहे.

  हे ही वाचा-रात्री झोप लागत नाही? दुधात तूप घालून प्या...; जाणून घ्या तूप खाण्याचे 6 फायदे

  दरम्यान, स्वदेशी जागरण मंचच्या (Swadeshi Jagran Manch) राष्ट्रीय सह-संयोजक अश्विनी महाजन यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. सोधी यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘देशातील दुग्धव्यवसायाशी निगडीत असलेले बहुसंख्य शेतकरी हे भूमिहीन आहेत हे तुम्हाला माहिती नसावे. तुमच्या रचनेमुळे त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधनही नष्ट होऊ शकतं. दूध हे आमचा विश्वास आहे. आपल्या परंपरा, आपली चव, आपल्या खाण्याच्या सवयी यामध्ये दूध आहेच. पौष्टिक घटक मिळण्याचा हा सर्वांत सोपा आणि नेहमी उपलब्ध होणारा स्रोत आहे,’ असं त्यांनी या उत्तरात म्हटलं आहे.

  सोधी यांनी ट्विटरवर एक पोस्ट करून पेटाला या क्षेत्राची व्याप्ती निदर्शनास आणून दिली आहे. ‘100 दशलक्ष गरीब शेतकऱ्यांचा जगण्याचं साधन काढून घेऊन गेल्या 75 वर्ष त्यांच्या पैशातून उभारलेली व्यवस्था सोयापासून व्हेगन दूध निर्माण करणाऱ्या बड्या कंपन्यांकडे सोपवावी अशी पेटाची इच्छा दिसते. सर्वसामान्य नागरिकांना हे सोयापासून (Soy Milk) बनणारे महागडे दूध परवडणार आहे का?’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘देशातील 100 दशलक्ष दुग्धोत्पादक शेतकरी आहेत, त्यापैकी 70 टक्के भूमिहीन आहेत. व्हेगन दुधाकडे वळल्यास त्यांना उदरनिर्वाहाचे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे साधन मिळणार आहे का? किती लोक हे प्रयोगशाळेत तयार झालेलं कृत्रिम व्हिटॅमिन असलेले महागडे दूध घेऊ शकतील ? असा सवालही सोधी यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

  हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, पेटानं सोधी यांना लिहिलेल्या पत्रात जागतिक अन्न महामंडळ कारगिल यांच्या 2018मधील अहवालाचा दाखला दिला आहे. दूध हे आहारातील महत्त्वाचा घटक नाही असा कल वाढत असून, जगभरात दुधाची मागणी कमी होत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

  व्हेगन दूध म्हणजे काय ?

  गेल्या काही वर्षांपासून ज्यांना लॅक्टोजचा (Lactose) त्रास होतो अशा लोकांमध्ये आणि अन्य लोकांमध्येही वनस्पतीजन्य दूध (Plant Based Milk) वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. बदाम, तांदूळ, सोया ते नारळाच्या दुधाचा पर्याय आता सर्वत्र रुजला आहे. भारतातही व्हेगन दुधाचे प्रस्थ हळूहळू वाढत असून अनेक कंपन्या लॅक्टोजमुक्त तसंच सोया दूध उपलब्ध करत आहेत.

  First published:

  Tags: Dairy, International, Milk combinations, Vegan