जाहिरात
मराठी बातम्या / देश / Voter ID नसेल तरीही करता येईल मतदान, पण कसं? जाणून घ्या

Voter ID नसेल तरीही करता येईल मतदान, पण कसं? जाणून घ्या

Voter ID नसेल तरीही करता येईल मतदान, पण कसं? जाणून घ्या

मत देण्यासाठी मतदार यादीत नाव असावं लागतं. तसंच मतदाराकडे ओळखपत्रही असावं लागतं, पण हे ओळखपत्र नसेल, तरीही मत देता येऊ शकतं.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 12 नोव्हेंबर : हिमाचल प्रदेशमध्ये आज (12 नोव्हेंबर 22) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. हिमाचल प्रदेश हे राज्य सत्तापरिवर्तनासाठी ओळखलं जातं. आता मतपेटीत मतं बंद होतील आणि सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार हा निर्णयही त्याबरोबर मतपेटीतच बंद होईल. सर्वच पक्ष आणि उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. राज्यातल्या नागरिकांनी कोणाच्या बाजूनं कौल दिला आहे, हे मतमोजणीनंतर कळेलच. मात्र त्याआधी जनतेला आपलं मत नोंदवण्याचं कर्तव्य पार पाडावं लागेल. मत देण्यासाठी मतदार यादीत नाव असावं लागतं. तसंच मतदाराकडे ओळखपत्रही असावं लागतं, पण हे ओळखपत्र नसेल, तरीही मत देता येऊ शकतं. मतदान करण्याचा अधिकार सर्व प्रौढ नागरिकांना असतो, मात्र त्यासाठी निवडणूक आयोगाकडे नावनोंदणी करावी लागते. त्यानुसार आयोगाकडून प्रत्येक मतदाराला मतदार ओळखपत्र दिलं जातं. निवडणुकीवेळी मतदारांचं नाव त्यांच्या भागातल्या मतदारयादीत दिलं जातं. मतदारयादीत नाव असेल, तरच मतदान करता येतं. त्यामुळे प्रत्येक नागरिकानं मतदान करण्याआधी आपलं नाव यादीत आहे का हे तपासायला हवं. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर याबाबतची माहिती मिळू शकते. निवडणूक आयोगानं प्रत्येक राज्यासाठी वेगळी वेबसाईट तयार केली आहे. त्यावर जाऊन आपल्या प्रभागानुसार स्वतःचं नाव मतदारयादीत आहे का ते तपासता येऊ शकतं. मतदार यादीत नाव असेल, तर मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येतं. पण मतदार ओळखपत्र नसेल, तरीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही सरकारी ओळखपत्राच्या आधारावर नागरिक मतदान करू शकतात. सरकारी ओळखपत्रासोबत एखादं फोटो आयडी दाखवून मत देता येतं. आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक पासबुक, विम्याचं स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट यापैकी कोणत्याही ओळखपत्राचा यासाठी उपयोग करता येऊ शकतो. जास्तीतजास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत असतात. मतदारांनीही मतदारयादीमध्ये आपलं नाव आहे का हे तपासलं पाहिजे. नाव नसल्यास ते नोंदवण्यासाठी आवश्यक ते अर्ज भरून माहिती दिली पाहिजे. म्हणजे मतदान करता येऊ शकतं. मतदान करणं हा भारतीय नागरिकाला संविधानानं दिलेला महत्त्वाचा अधिकार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये उद्या मतदान होणार आहे. विधानसभेच्या 68 जागांसाठी हे मतदान होईल. त्याचा निकाल 8 डिसेंबर रोजी लागणार आहे. राज्यातील सध्याच्या परिस्थितीनुसार, भाजप आणि काँग्रेस हे दोन पक्ष परस्परांना जोरदार लढत देत आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात