Home /News /national /

'पतीच्या मृत्यूनंतर मुलींना कसं सांभाळू'; माजी अधिकारी घरकाम करणाऱ्या महिलेचा झाले आधारवड

'पतीच्या मृत्यूनंतर मुलींना कसं सांभाळू'; माजी अधिकारी घरकाम करणाऱ्या महिलेचा झाले आधारवड

माजी अधिकाऱ्याच्या कुटुंबाने या महिलेला ज्याप्रकारे मदत केली आहे, हे करण्यासाठी खरंच मन मोठं असावं लागतं.

    ग्वालियर, 24 नोव्हेंबर : घराघरांमध्ये जाऊन साफसफाई आणि घरकाम करणारी महिला गौरीने (नाव बदललं आहे) कधी विचार केला नसेल की तिच्या दोन मुली एका मोठ्या घरात आणि चांगल्या ठिकाणी मोठी होईल. मात्र गौरीचं हे न पाहिलेलं स्वप्नही पूर्ण झालं आहे. ज्या घरात गौरी काम करते, ते ग्लालियरच्या माजी अतिरिक्त महाधिवक्ता देवेंद्र दुदावत (नाव बदललेलं) यांचं आहे. गौरीच्या पतीच्या अकाली मृत्यूमुळे आणि आर्थिक अडचणींमुळे तिला आपल्या दोन्ही मुलींना  (एक 7 वर्षांची तर दुसरी 10 वर्षे) योग्य प्रकारे वाढवता येत नव्हतं. गौरीची ही व्यथा पाहून दुदावत कुटुंबाने दोन्ही मुलींना आपल्या घरात ठेवून घेतलं. कुटुंबाने यासाठी कायद्यानुसार पहिल्यांदा जिल्हा प्रशासनाकडे निवेदन केलं आणि फॉस्टर केअरच्या नियमांतर्गत मुलींची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. आता दुदावत कुटुंबाचा संकल्प आहे की दोन्ही मुलींना खूप शिकवून त्यांच्या पायावर उभं करायचं आणि लग्नापर्यंत त्यांची जबाबदारी घ्यायची. दुदावत यांनी ग्वालियरच्या बाल कल्याण समितीला यासंदर्भावत निवदेन दिलं आहे. त्यानुसार त्यांना मुलींची फॉस्टर केअर घ्यायची आहे. समितीचे तत्कालीन अध्यक्ष केके दीक्षित यांनी माजी अतिरिक्त महाधिवक्त्यांकडून चरित्र प्रमाणपत्र मागितलं आहे. सोबतच समितीने यासाठी उशिर केला आणि फॉस्टर केअरही नाही दिली. समितीची अशा प्रकारची वागणूक पाहून दुदावत कुटुंबीयांनी कलेक्टर कौशलेंद्र विक्रम सिंह यांच्या कार्यालयात निवेदन दिलं. कलेक्टर यांनी तत्काळ एका वर्षांच्या काळासाठी फॉस्टर केअरचा आदेश जारी केला आहे. हे ही वाचा-गँगस्टरची बहिण...बुरखा आणि गोळीबार; महिलेने केलेल्या फायरिंगचा Video Viral शाळेत नाव नोंदवलं आणि... माजी अतिरिक्त महाधिवक्त यांनी फॉस्टर केअरचा अधिकार मिळाल्यानंतर दोन्ही मुलींचा शहरातील चांगल्या शाळेत अॅडमिशन करण्यात आलं आहे. घरात त्यांचा अभ्यास घेण्यासाठीदेखील ते स्वत: वेळ काढतात. शासनाकडून फॉस्टर केअरअंतर्गत 2000 रुपयांची रक्कम मुलींना मिळते, ते जमा करण्यासाठी त्यांनी मुलींचे बँक खाते सुरू केले आहे. कारण नंतर ही रक्कम मुलींसाठीच कामी येईल. ग्वालियरच्या जिल्हा महिला सशक्तीकरण अधिकारी शालीन शर्मा यांनी सांगितलं की, असे सकारात्मक पाऊल उचलल्याने समाजात चांगला संदेश दिला जात आहे. माजी अतिरिक्त महाधिवक्त यांनी पुढे येऊन आपल्या घरकाम करणाऱ्या महिलेच्या मुलांसाठी फॉस्टर केअरअंतर्गत जबाबदारी घेतली आहे. आता त्या दोन्ही मुलींचं भविष्य चांगलं होणार याचा सर्वांनाच आनंद आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या