मराठी बातम्या /बातम्या /देश /रस्त्यावरील पाण्यात पसरला Electric Current, लग्नासाठी चाललेल्या घोडीचा जागीच मृत्यू

रस्त्यावरील पाण्यात पसरला Electric Current, लग्नासाठी चाललेल्या घोडीचा जागीच मृत्यू

रस्त्यावरील पाण्यात वीजेचा (Horse died in the current spread in the road water) प्रवाह पसरल्यामुळे धक्का बसून एका घोडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

रस्त्यावरील पाण्यात वीजेचा (Horse died in the current spread in the road water) प्रवाह पसरल्यामुळे धक्का बसून एका घोडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

रस्त्यावरील पाण्यात वीजेचा (Horse died in the current spread in the road water) प्रवाह पसरल्यामुळे धक्का बसून एका घोडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

जयपूर, 22 नोव्हेंबर: रस्त्यावरील पाण्यात वीजेचा (Horse died in the current spread in the road water) प्रवाह पसरल्यामुळे धक्का बसून एका घोडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पाऊस पडून गेल्यानंतर रस्त्यावर पाणी साचण्याच्या घटना (Water on the road) अनेक भागांत घडत असतात. हे पाणी किरकोळ स्वरुपाचे असेल, तर त्याची (Traffic passing through road water) फारसी फिकीर न करता त्यातूनच वाहतूक सुरू असते. अनेकदा हे पाणी आजूबाजूच्या नागरिकांच्या अंगावरही उडत असतं. मात्र हे पाणी कापून जाणारी वाहनं आणि त्यातून वाट चाललेले नागरिक हे चित्र देशातील बहुतांश शहरांमध्ये बघायला मिळतं. राजस्थानच्या हिंडौन भागात मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे.

पाण्यात पसरला करंट

राजस्थानच्या हिंडौन भागात पाण्यात अचानक करंट पसरला होता. ज्या भागात पाणी भरलं होतं, त्या भागातील एक ट्रान्सफॉर्मर खराब झाला होता आणि त्याचा करंट पाण्यात पसरला होता. त्याचवेळी शहरात असलेल्या एका लग्नसमारंभासाठी एक घोडी घेऊन तिचा मालक चालला होता. ज्यावेळी ही घोडी पाण्यापाशी आली आणि पाण्यात घोडीनं प्रवेश केला, तेव्हा घोडीला वीजेचा जोरदार धक्का बसला. या धक्क्याने घोडी काही अंतरावर फेकली गेली आणि खाली कोसळली.

मालक थोडक्यात बचावला

घोडीच्या पाठीवर गादी टाकून बसलेला मालक या धक्क्यातून थोडक्यात बचावला. गादीमुळे वीजेचा करंट मालकापर्यंत पोहोचला नाही. त्यामुळेच त्याचा जीव वाचला. जर गादी न टाकता तो बसला असता तर वीजेच्या जोरदार धक्क्याने मालकाच्या जीवालादेखील धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

हे वाचा- किरकोळ कारणातून मालकाची सटकली; लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घेतला कामगाराचा जीव

पोलिसांची घटनास्थळी धाव

ही घटना समजताच पोलिसांनी वीज मंडळाला विद्युत पुरवठा खंडित करण्याची सूचना देत घटनास्थळी धाव घेतली. घोडीचा मृतदेह प्राण्यांच्या डॉक्टरांना बोलावून त्यांच्या ताब्यात पोस्टमॉर्टेमसाठी देण्यात आला. त्यानंतर घोडीचा मृतदेह तिच्या मालकाकडे सुपूर्द करण्यात आला.

First published:
top videos

    Tags: Electrical wire, Electricity, Water