जाहिरात
मराठी बातम्या / देश / Manipur Violence: 'दिसताक्षणी गोळ्या घाला', केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे जवानांना आदेश

Manipur Violence: 'दिसताक्षणी गोळ्या घाला', केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे जवानांना आदेश

मणिपूरमध्ये हिंसाचार नेमका कशामुळे घडला?

मणिपूरमध्ये हिंसाचार नेमका कशामुळे घडला?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना हे आदेश देण्याची वेळ का आलीय, नेमकं मणिपूरमध्ये काय सुरू आहे समजून घ्या

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

 चुराचंदपूर : भारतातील पूर्वोत्तर भागात असलेलं राज्य मणिपूर सध्या धगधगत आहे. तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळ सुरू आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीची बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर त्यांनी मणिपूरमधील सुरक्षा वाढवली असून दिसताक्षणी समाजकंटकांना गोळ्या घालण्याचे आदेश देखील दिले आहेत. नेमकं काय घडतंय? राज्याच्या लोकसंख्येपैकी 53 टक्के नागरिक हे मेईती समुदाय अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची मागणी करत आहे. या विरोधात चुराचंदपूर जिल्ह्यातील तोरबांग भागात ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूरच्या वतीने ‘आदिवासी एकता मार्च’ काढण्यात आला. बुधवारी या निदर्शनात मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि हिंसाचार झाला. मणिपूर उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात राज्य सरकारला मेईती समुदायाच्या एसटी दर्जाच्या मागणीवर ४ आठवड्यांच्या आत केंद्राकडे शिफारस पाठवण्यास सांगितले होते. त्यानंतरच आदिवासी एकता मोर्चा काढण्यात आला

जाहिरात

हिंसाचारामागे नेमकं काय कारण? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चुरचंदपूर जिल्ह्यातील तोरबांग येथे मोर्चा निघाला होता. यादरम्यान शस्त्रे घेऊन आलेल्या जमावाने मेइती समुदायाच्या लोकांवर केला, त्याला जमावाने प्रत्युत्तर दिलं. या दरम्यान हिंसाचार झाला आणि त्यामुळे मणिपुरात जाळपोळ सुरू झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. 10 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवलं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील परिस्थिती हाताळण्यासाठी भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर 10,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात