हिंदू धर्म आहे की नाही? द्रमुक नेत्याच्या वक्तव्याने तमिळनाडूत पेटला नवा वाद!

हिंदू धर्म आहे की नाही? द्रमुक नेत्याच्या वक्तव्याने तमिळनाडूत पेटला नवा वाद!

'राजकीय पक्षांच्या अजेंड्यांमुळे हिंदुत्वाला सांप्रदायिक शब्द म्हणून ओळख मिळाली.'

  • Share this:

चेन्नई 24 डिसेंबर: दक्षिण भारतात कधी 'हिंदी'वरून वाद निर्माण होतो, तर कधी 'हिंदू'वरून. सध्या तमिळनाडूमध्ये पुन्हा एकदा हिंदुत्व किंवा हिंदू धर्म या शब्दावरून वातावरण तापलं आहे. कलाराशी नटराजन (Kalarasi Natarajan) या उपदेशकांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर भाजप (BJP) नेत्यांनी द्रमुकच्या (DMK) नेत्यांवर हिंदूविरोधी असल्याचा आरोप पुन्हा एकदा केला आहे. कारण नटराजन यांचं ते वक्तव्य द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन (M. K. Stalin) यांच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं. वाद बाजूला ठेवला, तरी मग यातून पुन्हा प्रश्न निर्माण होतो, की खरंच हिंदुत्वाला (Hindutva) धर्म (Religion) म्हणणं योग्य आहे की नाही?

नटराजन यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात म्हटलं होतं, 'हिंदुत्वाला धर्म म्हटलं जाऊ शकत नाही. कारण त्याचं अस्तित्व केवळ काही शतकांपूर्वीपासूनच आहे. आपण सगळे शैव आहोत आणि त्यात जास्त महत्त्वाचं हे आहे, की आपण तामिळ आहोत.'

स्टॅलिन यांनी धार्मिक अजेंड्यापासून (Agenda) स्वतःला वेगळं करत आधीही हे सांगितलं आहे, की ते हिंदूविरोधी किंवा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीत, तर तामिळी समाजाच्या बाजूचे आहेत.

या पार्श्वभूमीवर, हिंदुत्व काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करू.

हिंदुत्व कसं समजून घ्यायचं?

लेखक, इतिहासकार किंवा प्रसिद्ध नेत्यांच्या विचारांच्या बाजूने गेलो, तर यावर खूप मोठी चर्चा होऊ शकते. पण सध्या आपल्याला यातून काही निष्कर्षाप्रत पोहोचायचं असेल, तर आपण दृष्टिकोनातून ही व्याख्या समजून घेऊ शकतो. तसंच देशाच्या न्यायपालिकेचं सर्वोच्च अंग असलेल्या सर्वोच्च न्यायालयाचा दृष्टिकोनही पाहू शकतो.

सुरुवातीला आपण सध्याचे प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू आणि उपदेशक सद्गुरू जग्गी वासुदेव (Jaggi Vasudev) यांचे विचार जाणून घेऊ. ते ईशा फाउंडेशनचे संस्थापक आहेत. जग्गी वासुदेव यांच्या लेखाच्या हवाल्याने हे स्पष्टपणे सांगता येऊ शकतं, की हिंदुत्व यासारखा शब्द, संकल्पना अलीकडेच काही काळापूर्वी प्रचलित झालेली आहे. हिंदू शब्ददेखील सिंधूपासून बनलेला आहे. सिंधूच्या (Sindhu) भूभागात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती असा त्या शब्दाचा अर्थ. ही एक सांस्कृतिक आणि भौगोलिक ओळख होती. जसं आपण आपल्याला इंडियन (भारतीय) म्हणवून घेतो, ते इंग्रजांच्या प्रभावामुळे काही वर्षांपूर्वीच आपण आपली ओळख सांगण्यासाठी निवडला आहे.

हिंदू शब्दावरून ओळख सांगण्याची परंपरा यापेक्षा जुनी आहे. हे समजून घ्यायला हवं, की यावरून तुम्ही तुमची विचारधारा नव्हे, तर तुम्ही कोणत्या भागात जन्माला आलात, ते सांगता. काही शतकांपासून एका खास भौगोलिक स्थितीमध्ये जी संस्कृती वाढली, फुलली, तिचं प्रतिनिधित्व हा शब्द करतो.

दुसऱ्या बाजूला सद्गुरू असंही सांगतात, की हिंदू असणं याचा अर्थ मूर्तिपूजक असणं असाही होत नाही. तुम्ही कोणत्या देवाची पूजा करत असलात, तरी हिंदू असू शकता आणि पूजा करत नसलात तरी हिंदू असू शकता. केवळ काळानुसार आणि बाह्य प्रभावांमुळे असं झालं आहे, की हिंदू शब्द त्याच्या भौगोलिक किंवा सांस्कृतिक ओळखीऐवजी धार्मिक ओळख बनला.

मायभाषेसाठी महाराष्ट्राच्या अप्सरेची धडपड; सोनाली कुलकर्णीने घेतला मोठा निर्णय

'हिंदू' हा कुठला 'वाद' नाही, असं सद्गुरू म्हणतात. तसं ठरवण्याचे प्रयत्न असफल ठरतील. कारण धर्म तर सनातन धर्मच आहे आणि तो असा विचार आहे, की जो निसर्गात सगळ्यांना स्वतःत सामावून घेतो, कोणालाही बाहेर टाकत नाही. हिंदू हा धर्म नाही, तर सांस्कृतिक आधारावर सांगायचं झाल्यास, जीवन जगण्याची एक पद्धती आहे.

सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) दृष्टिकोन कसा आहे?

भारताच्या राज्यघटनेत धर्मनिरपेक्षतेचा सिद्धांत समाविष्ट आहे. सरकारी आणि प्रशासकीय कामकाजासाठी तो आधारभूत आहे. तरीही राजकीय पक्ष धार्मिक अजेंड्याला खतपाणी घालतात. हिंदुत्व किंवा अशा अन्य कोणत्या संप्रदायाच्या चर्चा जेव्हा राजकीय पातळीवर वादाचं रूप घेतात, तेव्हा त्या कोर्टात पोहोचल्या आणि त्या वेळी सुप्रीम कोर्टाने त्यावर वेळोवेळी आपलं म्हणणं अशा शब्दांत मांडलं. 1966 सालच्या शास्त्री यज्ञपुरुषादजी खटल्यामध्ये पाच न्यायाधीशांच्या संवैधानिक पीठाने अशी टिप्पणी केली होती - 'इतिहास आणि व्युत्पत्तीच्या सिद्धांताआधारावरून कळतं, की हिंदू शब्द कशा प्रकारे वादात सापडला; पण साधारण पातळीवर विचार करायचा झाल्यास विद्वान लोक याच्याशी सहमत आहेत, की हिंदू या शब्दाचा अर्थ थेट सिंधू नदीशी जोडलेला आहे. हिंदू धर्माची व्याख्या करणं अशक्य नाही; पण अवघड जरूर आहे.

या धर्मात कोणी एकच प्रवर्तक नाही, की एकच देव नाही. या धर्माचा सिद्धांत एकच नाही, की दार्शनिक विचारही एकाच प्रकारचे नाहीत. धार्मिक पद्धती किंवा परंपराही एका प्रकारच्या नाहीत. एकंदर विचार केला, तर याला जीवन जगण्याची पद्धत मानू शकतो.'

पुण्यात शाळा उघडण्याबाबत अखेर झाला निर्णय; 4 जानेवारीला होणार सुरू

हिंदुत्व हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात वापरणं हे कायद्याचं उल्लंघन आहे का, याबाबतचं उत्तर रमेश यशवंत प्रभू खटल्यात सुप्रीम कोर्टाने दिलं होतं. या प्रकरणात 1996मध्ये कोर्टाने सांगितलं होतं, की 'हिंदू किंवा हिंदुत्व या शब्दाचा विचार कोण्या एका धर्माशी जोडून करणं चुकीचं आहे. हा शब्द भारतातल्या लोकांची प्रकृती आणि संस्कृती यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यवहारांच्या दृष्टीने समजून घेतला पाहिजे. या शब्दाचा वापर सांप्रदायिकतेचा वाद भडकवण्यासाठी चुकीच्या अर्थाने केला गेला, तरीही या शब्दाचा मूळ अर्थ बदलत नाही.'

प्रसिद्ध वकील आणि कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी (Ram Jethmalani) यांनी म्हटलं होतं, की 'सुप्रीम कोर्टाचा निर्णय हे स्पष्टपणे सांगतो, की हिंदुत्व दुसऱ्या कोणत्या संघटित धर्माशी वैर धरत नाही किंवा दुसऱ्या कोणत्या धर्मापेक्षा श्रेष्ठ असल्याचा दावा करत नाही.'

जेठमलानी यांच्या म्हणण्यानुसार, राजकीय पक्षांच्या अजेंड्यांमुळे हिंदुत्वाला सांप्रदायिक शब्द म्हणून ओळख मिळाली.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 24, 2020, 9:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या