जाहिरात
मराठी बातम्या / देश / Haryana News: पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या आमदारासोबत महिलेचं धक्कादायक कृत्य, 50 जणांवर गुन्हा दाखल

Haryana News: पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या आमदारासोबत महिलेचं धक्कादायक कृत्य, 50 जणांवर गुन्हा दाखल

आमदारासोबत महिलेचं धक्कादायक कृत्य

आमदारासोबत महिलेचं धक्कादायक कृत्य

Haryana News: जजपाचे ज्येष्ठ नेते ईश्वर सिंह हे कैथल जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असताना भाटिया गावात त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी एका महिलेने त्यांच्या कानशिलात लगावली.

  • -MIN READ Haryana
  • Last Updated :

चंडीगड, 16 जुलै : हरियाणात गुहला आमदार ईश्वर सिंह यांना कानशिलात लगावल्याचं प्रकरण आता पेटलं आहे. हरियाणा राज्य अनुसूचित आयोगाचे अध्यक्ष डॉ. रविंदर बलियाला यांनी आता या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी हरियाणाच्या डीजीपीला या प्रकरणी कारवाई करण्यास आणि या प्रकरणाचा सर्व अहवाल राज्य अनुसूचित आयोगाला सादर करण्यास सांगितले आहे. कैथलमध्ये पुराची पाहणी करण्यासाठी आलेले आमदार ईश्वर सिंह यांना महिलेने थोबाडात मारली होती. ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनुसूचित आयोगाने विधानसभा अध्यक्षांशीही संपर्क साधला राज्य अनुसूचित आयोगाचे अध्यक्ष डॉ. रविंदर बलियाला यांनी याप्रकरणी हरियाणा विधानसभा अध्यक्षांशी संपर्क साधला. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी विधायक धोरण तयार करावे, असे बलियाला यांच्या वतीने सांगण्यात आले. त्याचबरोबर या प्रकरणी डीजीपींकडून स्वतंत्र सर्वसमावेशक अहवाल मागवण्यात आला आहे. आमदार काय म्हणाले? या प्रकरणाबाबत जेजेपी आमदार ईश्वर सिंह म्हणतात की ते लोकप्रतिनिधी आहेत. पुरामुळे लोक अडचणीत आले आहेत. अशा स्थितीत त्यांचा राग रास्त आहे. लोकांच्या समस्या ऐकून त्या सोडवणे हे त्यांचे कर्तव्य आहे, पण स्त्रीच्या कृतीतून तिची नैतिकता दिसून येते. त्या महिलेवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही, असेही आमदाराच्या वतीने यापूर्वी सांगण्यात आले होते. त्यांनी महिलेला माफ केले आहे. वाचा - …म्हणून शरद पवारांची भेट घेतली; भेटीवर प्रफुल्ल पटेलांची पहिली प्रतिक्रिया 12 जिल्ह्यांमध्ये पुराचा कहर हरियाणातील 12 जिल्हे पुराच्या तडाख्यात आले आहेत. त्यापैकी अंबाला, यमुनानगर, कर्नाल, कैथल, कुरुक्षेत्र आणि पानिपत या 6 जिल्ह्यांची स्थिती बिकट आहे. या जिल्ह्यांतील 585 गावांना पुराचा अधिक फटका बसला आहे. एकीकडे यमुना नदीच्या पाणीपातळीत घट झाली असताना मार्कंडा, घग्गर, सरस्वतीसह अन्य नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. जजपाचे ज्येष्ठ नेते ईश्वर सिंह हे कैथल जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असताना भाटिया गावात त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. ते लोकांच्या समस्या ऐकून घेत असताना एका महिलेने त्यांना थोबाडीत दिली होती. या घटनेनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आमदार सिंह यांना बाजूला नेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली होती. जजपाचे प्रदेशाध्यक्ष निशान सिंह यांनी या घटनेचा निषेध करताना ज्येष्ठ नेत्यासोबत असं घडायला नको होतं, असे म्हटले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात