Home /News /national /

पत्नीला असं काही भयानक करण्यास भाग पाडलं की, न्यायालयानं सुनावली सात वर्षांची कैद

पत्नीला असं काही भयानक करण्यास भाग पाडलं की, न्यायालयानं सुनावली सात वर्षांची कैद

पती-पत्नीचं नातं हे आयुष्यभर एकमेकांना आधार देण्यासाठीचं नातं असतं. मात्र या प्रकरणात पतीनंच पत्नीला भयंकर छळलं.

    रोहतक, 25 फेब्रुवारी : पती-पत्नीचं नातं भारतीय संस्कृतीत (Indian culture) अतिशय पवित्र आणि साता जन्माचं समजलं जातं. मात्र या नात्याला काळिमा फासणारी घटना एके ठिकाणी घडली आहे. हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात न्यायालयानं (Haryana Rohtak District) पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध (Husband did Unnatural sex with wife) ठेवणाऱ्या पतीला 7 वर्षांची कैद सुनावली आहे (husband sentenced 7 year jail). हे प्रकरण मागच्या वर्षी घडलेलं आहे. जिल्ह्यातील शिवाजी कॉलनी पोलीस ठाणे भागातील एका गावामधील महिलेनं केस दाखल केली होती. पतीनं दारू पिऊन आपल्याशी अनैसर्गिक शारीरिक संबंध केले असं त्या तक्रारीत म्हटलं होतं. पत्नीनं नकार दिला असता पतीनं तिला मारहाण केली. इतकंच नव्हे तर जळती बिडी तिच्या छातीवर चुरगाळली. पत्नीनं मदतीचा धावा केला असता तिची तीन मुलं तिच्याजवळ धावत पोचली. यानंतर पती तिथून पसार झाला. (हे वाचा 'मला खूप मारते, आता वैतागलोय'; पत्नी पीडित नवऱ्याचं महिला हेल्पलाइनकडे गाऱ्हाणं) या प्रकरणात दोषी पतीला अतिरिक्त जिल्ह्या आणि सत्र न्यायाधीश आरपी गोयल यांच्या न्यायालयानं 7 वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायालयानं या दोषीला सात हजार रुपयांचा दंडही सुनावला आहे. जर त्यानं हा दंड भरला नाही तर त्याला अतिरिक्त सात महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल. यासोबतच कोर्टानं टिप्पणी केली, की संविधानाचे निर्माते असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी म्हटलं होतं, की जर एखाद्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर तिथल्या महिलांच्या प्रगतीला मोजावं लागेल. (हे वाचा पुण्यात शिकायला आले अन् मुलीला दिला जन्म, बाळाला दत्तक दिले आणि झाले अपहरण) न्यायालयानं हेसुद्धा म्हटलं, की स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) म्हणाले होते, की जसा पक्षी एका पंखानं उडू शकत नाही तशाच प्रकारे स्त्री आणि पुरुष एकमेकांशिवाय मार्गक्रमण करू शकत नाहीत. गुरू नानक देव म्हणाले होते, की महिलेनं राजांनाही जन्म दिला आहे. तिची निंदा केली जाऊ शकत नाही. पत्नीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवणं अतिशय असभ्य आणि घृणास्पद आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Court, Crime news, Haryana, Imprisonment, Sexual assault

    पुढील बातम्या