04 नोव्हेंबर : योगगुरू बाबा रामदेव आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. आता तर त्यांनी माझ्या सारख्या अविवाहित पुरुषांचा सन्मान करावा आणि ज्यांना दोन पेक्षा जास्त मुलं आहे त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा अशी मागणीच बाबा रामदेव यांनी केली. हरिद्वार इथं एका कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केलं. जुन्या काळात जनसंख्या कमी होती. तेव्हा वेदांमध्ये १० मुलांना जन्म द्यावा असं सांगितलं गेलंय. आता ज्यांच्यात सामर्थ्य आहे त्यांनी हे करावं, त्यांच्यातील १-२ आम्हाला देऊन टाका. आधीच भारताची लोकसंख्या १२५ कोटी आहे असंही बाबा रामदेव यांनी गमंतीने सांगितलं.
#WATCH: Yog Guru Ramdev says, "is desh mein jo hamari tarah se vivah na kare unka vishesh samman hona chahiye, aur vivah kare, to 2 se jyada santaan paida kare to uski voting right nahi honi chahiye" pic.twitter.com/hXhsZtM07l
— ANI (@ANI) November 4, 2018
एनआयए वृत्तसंस्थाने दिलेल्या वृत्तानुसार, या देशामध्ये जे तरुण माझ्यासारखं लग्न करू शकले नाही, त्यांचा विशेष सन्मान झाला पाहिजे. जर कुणी लग्न केलं असेल आणि त्याला दोनहुन अधिक मुलं असतील तर अशा पुरुषांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला पाहिजे असं बाबा रामदेव म्हणाले. याआधी शनिवारी बाबा रामदेव यांनी राम मंदिर निर्माणाबाबत वक्तव्य केलं होतं. जर कोर्टाचा निर्णय उशिराने आला तर संसदेत यासाठी विधेयक आणले पाहिजे. राम मंदिराच्या ठिकाणी रामाचे मंदिर झालेच पाहिजे. संत आणि राम भक्तांनी संकल्प केलाय की राम मंदिराला आणखी उशीर नको, यावर्षीच देशाला शूभ समाचार मिळणार असं बाबा रामदेव म्हणाले होते. ===============