नवी दिल्ली, 22 जून : देशाच्या पहिल्या महिला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 5 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प दस्तऐवजांचं प्रकाशन आजपासूनच सुरू करण्यात आलं आहे. या प्रक्रियेपूर्वी दरवर्षी प्रमाणे यंदाही अर्थमंत्रालयात ‘हलवा वितरण’ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यास निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुरदेखील सहभागी झाले होते. यासोबतच जवळपास 100 अधिकाऱ्यांना आता अर्थसंकल्प सादर होईपर्यंत नॉर्थ ब्लॉकमध्येच वास्तव्य करावं लागणार आहे. (पाहा : VIDEO : बिचुकलेचं पितळ उघडं, आणखी एका गुन्ह्यात अडकला ) हलवा वितरणाची पारंपरिक पद्धत दरवर्षी अर्थसंकल्पाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी नॉर्थ ब्लॉकमध्ये अर्थमंत्रालयाच्या कार्यालयात एका मोठ्या कढईमध्ये हलवा तयार केला जातो. केंद्रीय अर्थमंत्री स्वतः या सोहळ्यास सहभागी होतात. हलव्याची ही पद्धत फार पूर्वीपासून चालत आली आहे. या परंपरा राबवण्यामागे कारण असं की हलव्याला शुभ मानलं जातं. तसंच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गोड पदार्थानं केली जाते.
Delhi: 'Halwa Ceremony' being held at Finance Ministry to mark the beginning of printing of documents relating to Union Budget 2019-20. pic.twitter.com/tQ1rik3pEl
— ANI (@ANI) June 22, 2019
(पाहा : VIDEO: ‘मुख्यमंत्री भाजपचाच होणार’; कार्यकर्त्यांची भावना! ) …म्हणून 100 अधिकारी घरी जाऊ शकणार नाहीत अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व कागदपत्रं काही निवडक अधिकारीच तयार करतात. या प्रक्रियेत वापरात येणारे सर्व संगणकांना अन्य नेटवर्कपासून डीलिंक केलं जातं. अर्थसंकल्पावर कार्य करणारे जवळपास 100 अधिकारी दोन ते तीन आठवडे नॉर्थ ब्लॉक कार्यालयातच वास्तव्य करतात. या अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर पडण्याची परवानगी नसते. अर्थसंकल्प फुटू नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते. चौथ्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या तरुणाला जवानाने जीवाची बाजी लावून वाचवलं VIDEO

)







