जाहिरात
मराठी बातम्या / देश / 210 किलो वजन उचलणं बेतलं जीवावर, मान मोडली अन् जागेवर कोसळला; 33 वर्षीय फिटनेस ट्रेनरचा मृत्यू

210 किलो वजन उचलणं बेतलं जीवावर, मान मोडली अन् जागेवर कोसळला; 33 वर्षीय फिटनेस ट्रेनरचा मृत्यू

जिममध्ये फिटनेस ट्रेनरचा मृत्यू

जिममध्ये फिटनेस ट्रेनरचा मृत्यू

जस्टिन विक्कीचा मृत्यू त्याची मान मोडल्याने आणि हृदय, फुफ्फुस यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या शिरा दबल्याने झाल्याचं सांगण्यात येत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

बाली, 23 जुलै : फिटनेस ट्रेनरचा जिममध्ये वजन उचलताना मृत्यू झाल्याची घटना इंडोनेशियात घडली आहे. वयाच्या ३३ व्या वर्षी जस्टिन विक्की या फिटनेश इन्फ्लुएन्सरचा मृत्यू झाला. न्यूज एशियाने दिलेल्या वृत्तानुसार, १५ जुलैला ही दुर्घटना घडली. इंडोनेशियातील बालीत एका जिममध्ये तो व्यायाम करत होता. या घटनेचा एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये जस्टिन विक्की हा पॅराडाइज बाली जिममध्ये खांद्यावर बारबेलसह स्क्वाट प्रेस करताना दिसतो. स्क्वाटमध्ये गेल्यानंतर जस्टिन विक्कीला ताठपणे उभा राहणं जमत नव्हतं. जेव्हा त्याने वजन उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा बारबेल त्याच्या मानेवर होती. पण वर उचलण्याआधीच तो खाली बसला तेव्हा बारबेलचं पूर्ण वजन त्याच्या मानेवर पडून मानच मोडली. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

जाहिरात

व्हिडिओत दिसतं की, विक्कीला मदत करण्यासाठी त्याच्यासोबत स्पॉट्टर होता. पण त्यालाही विक्कीचे संतुलन राखता आले नाही. वजन उचलण्याच्यावेळी स्पॉट्टर मदत करतो. जस्टिन विक्की २१० किलो वजन उचलण्याचा प्रयत्न करत होता अशी माहिती आता समोर येत आहे. जस्टिन विक्कीचा मृत्यू त्याची मान मोडल्याने आणि हृदय, फुफ्फुस यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या शिरा दबल्याने झाल्याचं सांगण्यात येत आहे. जस्टिन विक्कीला या घटनेनंतर तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रियाही केली गेली. मात्र  शस्त्रक्रियेनंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला. जस्टिन विक्कीच्या मृत्यूनंतर त्याला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात आहे. जस्टिन फिटनेस ट्रेनरपेक्षाही खूप काही होता अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: fitness , Viral
  • First Published :
जाहिरात
जाहिरात