जाहिरात
मराठी बातम्या / देश / The Tesla Story! जो नंबर 30 वर्षांपूर्वी बसचा होता, तोच नव्या कोऱ्या Tesla car ला, तरुणाची emotional Story

The Tesla Story! जो नंबर 30 वर्षांपूर्वी बसचा होता, तोच नव्या कोऱ्या Tesla car ला, तरुणाची emotional Story

बसचा फोटो

बसचा फोटो

1990 च्या दशकात चेंगप्पा आणि आदित्य ही दोन मुलं बीएमटीसीच्या बसने शाळेत जायची.

  • -MIN READ Local18 Bangalore,Karnataka
  • Last Updated :

सौम्या कलश, प्रतिनिधी बंगळूरू, 10 मे : बसमधून शाळेत जाणारी काही मुले बस किंवा ट्रक चालवण्याची कल्पना करतात. अशी मुले मोठी झाल्यावर अशा आठवणींचा आनंद लुटताना दिसतात. अशाच स्कूल बसच्या आठवणींना नवे वळण देणारी एक रंजक घटना इथे समोर आली आहे. फक्त बसच नाही तर बस ड्रायव्हरशी निगडीत आठवणी जेव्हा परदेशात एका भारतीयाने (NRI) त्याच्या लहानपणीच्या बस ड्रायव्हरचा त्याच्या अगदी नवीन कारसोबतचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला तेव्हा सोशल मीडियावर बरेच लोक भावूक झाले. 1990 च्या दशकात चेंगप्पा आणि आदित्य ही दोन मुलं बीएमटीसीच्या बसने शाळेत जायची. बाकीच्यांप्रमाणे तेही सीटवर न बसता बसच्या बोनेटवर बसायचा आणि बस ड्रायव्हर त्या दोघांना मजेशीर किस्से सांगायचे. बंगळूरूमधील विद्यारण्यपुरा आणि यथवंतपुरा दरम्यानचा प्रवास असा व्हायचा. इतिहासाशी निगडीत ड्रायव्हरच्या गोष्टी चेंगप्पा आणि आदित्य यांना कायम आठवतात.

News18लोकमत
News18लोकमत

के धनपाल असे चालकाचे नाव आहे. धनपाल बोनेवटवर बसणाऱ्या या दोन मुलांना त्याच्या शाळेचे, बालपणीचे आणि मित्रांचे मजेदार किस्से सांगत असे. या कथांमध्ये ते बसच्या मशिनरी आणि मोटारीबद्दलच्या अनेक गोष्टी सांगायचे. नवीन घेतलेली कार

नवीन घेतलेली कार

यानंतर अनेक वर्ष गेली. ही मुले मोठी झाली. यात आता चेंगीने नुकतीच एक नवीन लाल रंगाची टेस्ला कार विकत घेतली. तसेच त्याने या कारसाठी आपला विशेष आणि आवडता KA01 F232 हा नंबर निवडला.  हा तोच नंबर आहे, जो बालपणी त्याच्या बसचा होता, ज्या बसला धनपाल चालवायचे. चेंगीने या कारसोबत एक व्हिडिओ शूट केला आणि त्याच्या बालपणीच्या अनेक आठवणी रेकॉर्ड केल्या आणि धनपालला पाठवल्या असता त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये चेंगी म्हणाला, ‘त्या बसमध्ये रोज तुझ्याशी बोलून 31 वर्षे झाली आहेत यावर माझा विश्वास बसत नाही. माझी बसेसची आवड तिथूनच सुरू झाली. आणि आपण नेहमीच किती नम्र आणि धैर्यवान आणि अद्भुत व्यक्ती होते. तुम्हाला निवृत्तीच्या शुभेच्छा आणि माझ्याकडून ही एक छोटीशी भेट समजा. तुम्ही आमच्या जुन्या दिवसांच्या गोष्टी नव्या जमान्यातल्या मुलांना त्याच पद्धतीने कसे सांगत आहात, याबाबतची माहिती मला मिळत असते…’ तर धनपालने अभिमानाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर तो म्हणाला, ‘मी जी बस चालवायचो ती मुलांची आवडती होती. पण चेंगप्पा आणि आदित्य अशी दोन मुलं होती, जी नेहमी बोनेटवर बसून माझ्याशी बोलत असत. दोघे अजूनही माझ्या संपर्कात आहेत. चेंगप्पाने घेतलेल्या नवीन गाडीचा नंबर मी चालवत असलेल्या बसचाच होता. मला त्याच्याकडून मिळालेल्या प्रेमामुळे मी खूप आनंदी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात