अहमदाबाद, 23 जुलै : गुजरातमध्ये पावसामुळे अनेक भागात पूर आला आहे. अहमदाबाद विमानतळ पाण्यात बुडाले असून रुग्णालयांमध्येही पाणी शिरले आहे. शनिवारी राज्यातील वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस झाला. यामुळे पोरबंदर आणि कच्छमधून जाणारे दोन राष्ट्रीय महामार्ग आणि १० राज्यमार्ग बंद करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाती अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ७३६ लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. तर जवळपास ३५८ जणांना वाचवले आहे. राज्यातील ३०२ रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. यात २७१ हे रस्ते हे गावांना जोडणारे आहेत. मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी शनिवारी रात्री उशिरा गांधीनगरमध्ये राज्य आपत्तकालिन संचालन केंद्रात एक आढावा बैठक घेतली. यात त्यांनी वैयक्तिकरित्या परिस्थितीचा आढावा घेतला. जुनागढमध्ये परिस्थिती गंभीर असून तिथे जाण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. त्यामुळे शेवटी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांशी बोलून माहिती घेतली. राज्यात कोसळधार! नौदल, हवाईदल, लष्कर अलर्ट मोडवर, ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा मुसळधार पावसामुळे पुराचा फटका बसलेल्या जिल्ह्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफची एकूण ९ पथके तैनात आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची दोन दोन पथके जुनागढमध्ये असून बचावकार्य सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारपर्यंत गिर-सोमनाथ, जुनागढ, कच्छ, पोरबंदर आणि दक्षिण गुजरातच्या वलसाड, नवसारी इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. आयुक्तांनी लोकांना गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं आहे. जुनागढमध्ये बुधवारी सकाळपासून मुसळधार पाऊस होत आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जुनागढमध्ये सकाळी ६ ते ८ या वेळेत मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे पुराची स्थिती आहे. बुधवारी जुनागढ जिल्ह्यात मांगरोळमध्ये ८.९ इंच पाऊस झाला. मालियाहाटिनात ६.२ इंच, वेरावलमध्ये ४.२ इंच तर सुत्रपाडामध्ये २.७ इंच पावसाची नोंद झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.