मराठी बातम्या /बातम्या /देश /

गुजरातमधील समाधी प्रकरणाचा नाट्यमय अंत, भक्तांची माफी मागत महंतांची मोठी घोषणा

गुजरातमधील समाधी प्रकरणाचा नाट्यमय अंत, भक्तांची माफी मागत महंतांची मोठी घोषणा

गुजरातमधील अहमदबादपासून 80 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या मेहसाणा तालुक्यातील छटीयादा गावातील महंत शप्त सुने यांनी रविवारी रात्री देहत्याग (Renounce Life) करण्याती घोषणा केली होती. या संपूर्ण प्रकरणाचा नाट्यमय अंत झाला.

  • Published by:  News18 Desk

मेहसाणा (गुजरात), 5 एप्रिल :  गुजरातमधील अहमदबादपासून (Ahmedabad) 80 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या मेहसाणा तालुक्यातील छटीयादा गावातील महंत शप्त सुने यांनी रविवारी रात्री देहत्याग (Renounce Life) करण्याची घोषणा केली होती. या संपूर्ण प्रकरणाचा नाट्यमय अंत झाला. त्याचबरोबर या महंतांना समाधी घेण्यात अपयश आले.

भक्तांची मागितली माफी

हे महंत समाधी घेणार म्हणून खास स्टेज तयार करण्यात आले होते. यापूर्वी केलेल्या घोषणेनुसार रविवारी रात्री 10 ते 11 दरम्यान महंत देहत्याग करण्यासाछी मंचावर बसले. एक तास ध्यान केल्यानंतरही त्यांचे प्राण गेले नाहीत. त्यानंतर महंतांनी एक खड्डा खोदण्याची सूचना केली. आपण त्यामध्ये समाधी घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मात्र, हे काही प्रत्यक्षात घडले नाही.

त्यानंतर त्यांनी या प्रकरणाबाबत भक्तांची माफी मागितली. मी या प्रकरणाबद्दल कोणतीही कायदेशीर शिक्षा भोगण्यासाठी तयार आहे. मी या घटनेनं अत्यंत व्यथित झालो असून आता भक्ती सोडणार आहे,'अशी घोषणा या महंतांनी केली.

वैज्ञानिक संघटनांनी केली कारवाईची मागणी

या संपूर्ण प्रकरानंतर विज्ञान जाथा या संघटनेनं महंतांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 'एखादा व्यक्ती देहत्याग करण्याची घोषणा करुन हजारो लोकांमध्ये अविश्वास निर्माण करतो. तसेच त्यांच्यात अंधश्रद्धा वाढवतो. समाधी घेण्याची घोषणा करणारा व्यक्तीच पहिला गुन्हेगार आहे. त्याला माफ करता येणार नाही. आम्ही या प्रकरणात पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत. या प्रकरणात फिर्यादी होण्याचीही आमची तयारी आहे,' अशी माहिती या संघटनेच्या जयेश पंड्या यांनी दिली आहे.

'कोरोना गाईडलाईन्स पायदळी तुडवून इतक्या लोकांना त्यांनी एकत्र आणले. एखादा सामान्य व्यक्ती असता तर प्रशासनानं त्याच्यावर कारवाई केली असती, या प्रकरणातही कारवाई झाली पाहिजे,' अशी मागणी देखील पंड्या यांनी केली.

(आता काय बोलावं! 'या' राज्याचे आरोग्य मंत्री म्हणतात, 'कोरोना नाही, मास्क वापरु नका' पाहा VIDEO )

परिवारानं केला होता विरोध

या महंतांनी 4 एप्रिल रोजी समाधी घेणार असल्याची घोषणा दोन वर्षांपूर्वीच केली होती. या कार्यक्रमाची त्यांनी पत्रिका देखील छापली होती. महंत यांच्या परिवारानं त्यांना देहत्याग न करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी 'तुमची देशाला गरज असून तुम्ही समाधी घेऊ नका,' अशी विनंती महंताना केली होती.

हा सर्व प्रकार घडत असताना पोलीस घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणावर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

First published:

Tags: Ahmedabad, Gujrat