जाहिरात
मराठी बातम्या / देश / तीन दिवसांमध्येच केजरीवालांना धक्का, 'आप'चा आमदार भाजपच्या वाटेवर, तीन जण संपर्कात!

तीन दिवसांमध्येच केजरीवालांना धक्का, 'आप'चा आमदार भाजपच्या वाटेवर, तीन जण संपर्कात!

तीन दिवसांमध्येच केजरीवालांना धक्का, 'आप'चा आमदार भाजपच्या वाटेवर, तीन जण संपर्कात!

गुजरात विधानसभेचे निकाल लागून फक्त तीनच दिवस झाले आहेत, पण अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ Gandhinagar,Gujarat
  • Last Updated :

गांधीनगर, 11 डिसेंबर : गुजरात विधानसभेचे निकाल लागून फक्त तीनच दिवस झाले आहेत. या निवडणुकीत भाजपला रेकॉर्डब्रेक यश मिळालं. अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष गुजरातमध्ये भाजपला तगडं आव्हान उभं करू शकतो, असं काही राजकीय जाणकार सांगत होते, पण त्यांचा हा अंदाज फोल ठरला. गुजरातमध्ये भाजपला 156, काँग्रेसला 17 आणि आपला 5 जागांवर यश मिळालं. या पैकी आता आपचा आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. विसवादर मतदारसंघातून भूपत भायानी आपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले, पण आता ते भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काही काळात भूपत भायानी भाजपला समर्थन देऊन त्यांच्या जुन्या पक्षात प्रवेश करू शकतात. भाजप उमेदवार हर्षद रिबडिया यांचा पराभव करून भूपत भायानी यांनी विजय मिळवला होता. भूपत भायानी यांनी भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला तर आम आदमी पक्षाला गुजरातमध्ये मजबूत होण्याआधीच मोठा धक्का बसेल. तसंच दुसऱ्या आमदारांमध्येही पक्षातल्या फुटीबाबत संशय निर्माण होऊ शकतो. गुजरात सरकारच्या शपथविधीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण, शिंदे सोहळ्याला जाणार ‘माझ्या मनात खूप दुविधा आहेत, माझ्या भागातल्या जनतेची भेट मला घ्यायची आहे. तुमच्या हिताचं काय आहे, हे मी त्यांना विचारेन. त्यांच्यासाठी जे योग्य असेल, तोच निर्णय मी घेईन. जनता सांगेल तो निर्णय घेतला जाईल. भाजपला समर्थन द्यायचं का नाही, हा विचार मी केलेला नाही,’ अशी प्रतिक्रिया भूपत भायानी यांनी दिली. आप आमदार भूपत भायानी आणि भाजप यांच्यातली चर्चा जवळजवळ पूर्ण झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे तीन अपक्ष आमदारांनीही भाजपला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे. बायडमधून धवल झाला, धानेरामधून मावजी देसाई आणि वाघोडियामधून निवडून आलेले धर्मेंद्र वाघेला यांनी एकत्र बैठक घेऊन भाजपला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे. धवल झाला आणि मावजी देसाई यांनी भाजपमधून तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात