तरुणीच्या आत्महत्येने खळबळ! 'माझं आयुष्य इतकचं होतं', असं VIDEO तून सांगत हसत हसत नदीत घेतली उडी

तरुणीच्या आत्महत्येने खळबळ! 'माझं आयुष्य इतकचं होतं', असं VIDEO तून सांगत हसत हसत नदीत घेतली उडी

"मला वाहत राहायचं आहे. ही नदी मला आपल्यात सामावून घेईल... ", असं म्हणत हसत हसत तरुणीने मारली नदीत उडी. त्याअगोदर या विवाहितेने पुलावर उभं राहूनच सेल्फी मोडवर व्हिडीओ शूट करून इंटरनेटवर अपलोड केला होता.

  • Share this:

अहमदाबाद, 27 फेब्रुवारी:  माझं आयुष्य एवढंच होतं. मी करते आहे त्याला कुणीही जबाबदार नाही. माझ्या इच्छेने मी हे करत आहे, अस हसत हसत सांगतानाचा VIDEO तिने अपलोड केला आणि तिथल्या तिथे नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.अहमदाबादमध्ये या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.  गुजरातमधील अहमदाबादच्या साबरमती नदीत उडी मारून विवाहितेने स्वतःल संपवलं. उडी मारण्यापूर्वी तिने सेल्फी मोडवर VIDEO केला आणि तो अपलोडही केला.

या व्हिडीओत ती विवाहिता म्हणते, 'माझं नाव आयेशा अमीर खान आहे. मी आज जे काही करत आहे. ते माझा इच्छेने करत आहे. माझावर कोणाचाही दबाव नाही. यासाठी कोणालाही जबबदार धरू नये. समजून जा की माझ आयुष्य इथपर्यंतच होत.मला जितकं आयुष्य मिळालं ते खूप सुखी होतं. त्याचबरोबर ती वडिलांना म्हणते’ केस सोडून द्या किती वेळ आणि किती लढणार?’.

पुढे ती असं म्हणते, "प्रेमच करायचं असेल तर दोन्हीकडून करा एकतर्फी प्रेमातून काहीच साध्य होत  नाही. लग्नानंतर सुद्धा प्रेम अपूर्णच राहतं. ही नदी मला आपल्यात सामावून घेईल. मला वाहत राहायचं आहे. मी एखाद्या हवेसारखी आहे. मला ज्यांना ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या मी सांगितल्या आहेत. आज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. मी गेल्यानंतर जे काही होईल त्याच्या जास्त गाजावाजा करू नका. दुआमें याद रखना,’जन्नत मिले न मिले’.चलो अलविदा", असं म्हणत या तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

(हे पहा :धक्कादायक! मोठ्या मुलीच्या उपचारासाठी पैसे नव्हते म्हणून लहान मुलीला 10 हजारांना)

ही विवाहिता अहमदाबाद येथे राहत होती. तिचं नाव आयेशा लियाकत अली असं होतं. तिच्या वडिलांनी याबाबत बोलताना म्हटल आहे. आयेशाचा 2018 मध्ये राजस्थान मधील ‘जालोर’ येथील अमीर अली याच्याशी विवाह झाला होता. मात्र आयेशाचा हुंड्यासाठी तिच्या सासरकडून सतत छळ होत होता. आम्ही पैसे देऊनसुद्धा हा छळ काही थांबला नव्हता. त्यांची पैशांची हाव सतत वाढतच होती. काही महिन्यांपूर्वी अमीर आयेशाला अहमदाबादला सोडून गेला होता.

आयेशांच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार अमीर आयेशाचा फोनसुद्धा उचलत नव्हता, किंवा फोनचं उत्तरही देत नव्हता. काही दिवसांपूर्वी रागात आयेशाने अमीरला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. तेव्हा अमीरने 'जाऊन मर' असं उत्तर दिलं होत. आणि त्यांनतर आज अखेर आयेशाने ही गोष्ट खरी करून दाखवली. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Published by: Aiman Desai
First published: February 27, 2021, 10:27 PM IST

ताज्या बातम्या