मराठी बातम्या /बातम्या /देश /गरब्यावरही GST? गुजरातमध्ये उडाला गोंधळ, नागरिकांमध्ये संताप

गरब्यावरही GST? गुजरातमध्ये उडाला गोंधळ, नागरिकांमध्ये संताप

आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गृहराज्य गुजरातमध्ये जीएसटीवरुन नवा वाद समोर आला आहे.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गृहराज्य गुजरातमध्ये जीएसटीवरुन नवा वाद समोर आला आहे.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गृहराज्य गुजरातमध्ये जीएसटीवरुन नवा वाद समोर आला आहे.

गांधीनगर, 4 ऑगस्ट : वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीवरुन एकामागून एक वाद समोर येत आहेत. इतकच नाही तर मंत्री निर्मला सीतारमण यांना संसदेत जीएसटीवर स्पष्टीकरण देण्याची गरज निर्माण झाली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गृहराज्य गुजरातमध्ये जीएसटीवरुन नवा वाद समोर आला आहे.

गरबा समारंभाच्या आयोजन आणि गरब्याशी संबंधित कपड्यांवर जीएसटी वसुल करण्याच्या सरकारच्या निर्णयावर लोक विशेषत: विरोध पक्षाने विरोध केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने कमर्शिअर गरबा समारंभावर एन्ट्रीपावर जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. वडोदरामध्ये अशा प्रकारे तब्बल 1 लाख पास जारी केले जातात. यामुळे राज्य सरकारला जीएसटीच्या रुपात 1.50 कोटी रुपयांहून अधिक कमाई होऊ शकते.

त्याशिवाय राजकोटमध्ये जारी होणाऱ्या 50 हजार पासांतून सरकारला 1 कोटी रुपयांहून अधिक कमाई होऊ शकते. एन्ट्री पास व्यतिरिक्त चनिया चोलीवर 5 टक्कांहून 12 टक्क्यांपर्यंत जीएसटी वसुल करण्याच्या तयारीत आहे. जर याच्या किमती 1000 रुपयांपर्यं पोहोचल्या तर 5 टक्क्यांच्या दराने जीएसटी लागले. याशिवाय 1000 हून अधिक किंमत असल्यास जीएसटी वाढून 12 टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

First published:
top videos

    Tags: Gujrat