नवी दिल्ली, 04 सप्टेंबर : पुढच्या वेळी जर तुम्ही एखाद्या सरकारी कार्यालयात गेलात आणि अधिकारी तुम्हाला म्हणाले की, ते 5 मिनिटांसाठी ‘योग ब्रेक’ (Yoga Break) घेत आहेत, तर आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही. किंबहुना, सरकारचीच अशी इच्छा आहे की, त्यांचे कर्मचारी कामादरम्यान ताजेतवाने राहावेत. त्यामुळं आता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना Y- ब्रेक अॅप (Y-Break App) डाउनलोड करण्यास सांगण्यात आलंय. योगाच्या पद्धती आणि फायदे या अॅपमध्ये सांगितले गेले आहेत. हे अॅप आयुष मंत्रालयानं विकसित केलंय. हा आदेश सरकारनं 2 सप्टेंबर रोजी काढलाय. त्यामुळं आता सरकारी अधिकाऱ्यांना दररोज कामादरम्यान 5 मिनिटांचा योगा ब्रेक मिळणार आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं (डीओपीटी) दोन दिवसांपूर्वी काढलेल्या आदेशात सर्व मंत्रालयांना या अॅपचा वापर करण्यास आणि तो इतरांनी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सांगितलं आहे. आदेशात लिहिलंय की, ‘भारत सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांना विनंती आहे की, Y- ब्रेक अॅपच्या वापराला प्रोत्साहन द्या.’ डीओपीटीनं 2 सप्टेंबरला जारी केलेल्या आदेशात म्हटलंय की, अँड्रॉईड-आधारित वाय-ब्रेक अॅप्लिकेशन डाउनलोड करणं बंधनकारक आहे. याच्या एका दिवस आधी आयुष मंत्रालयानं हे मोबाईल अॅप्लिकेशन एका मोठ्या कार्यक्रमात लाँच केलं. यात सहा मंत्र्यांनी भाग घेतला होता. डीओपीटी मंत्री जितेंद्र सिंहदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी कायदा मंत्री किरेन रिजिजू यांना ‘कामाच्या ठिकाणी पाच मिनिटे योग-ब्रेक लागू करण्याची विनंती केली, जेणेकरून लोक त्याचा लाभ घेऊ शकतील. हे वाचा - अजबच! 40 वर्षांपासून एक मिनिटही झोपली नाही ही महिला; आज आहे अशी अवस्था यावेळी उपस्थित मंत्र्यांनी संपूर्ण विधानसभेत अॅपवर दाखवल्याप्रमाणे योगासनं केली. कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी या अॅपचा वेगानं प्रसार होईल, असा विश्वास व्यक्त केला. आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पाच मिनिटांचा योग प्रोटोकॉल विशेषतः कार्यरत व्यावसायिकांसाठी त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी असल्याचं म्हटलं. कामाच्या ठिकाणी असलेला तणाव कमी करण्यासाठी, लोकांना ताजेतवाने करण्यासाठी आणि पुन्हा कामावर लक्ष केंद्रित करणं सोपं जावं यासाठी हे अॅप निर्मित केल्याचं ते म्हणाले. यात आसनं, प्राणायाम आणि ध्यान यांचा समावेश आहे. हे वाचा - दोन मुलांसोबतच रिलेशनशिप मुलीच्या अंगाशी, मुलांनी अश्लील फोटो शेअर केले सोशल मीडियावर 2 सप्टेंबर रोजीला केलेल्या डीओपीटी आदेशात म्हटलंय की, आयुष मंत्रालयानं 2019 मध्ये तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून हे अॅप विकसित केलं आहे. कामाच्या ठिकाणी 5 मिनिटांचा योग प्रोटोकॉल हे मॉड्यूल जानेवारी 2020 मध्ये सहा प्रमुख महानगरांमध्ये (दिल्ली, मुंबई, चेन्नई) पायलट प्रोजेक्ट म्हणून लाँच करण्यात आलं. याला मिळालेला प्रतिसाद खूप उत्साहवर्धक होता, असं या आदेशात पुढं म्हटलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.