• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • बंगालमधील हिंसाचार रोखण्याचा राज्यपालांचा सल्ला, CM पदाची शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या...

बंगालमधील हिंसाचार रोखण्याचा राज्यपालांचा सल्ला, CM पदाची शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या...

पदभार स्वीकारल्यानंतर आपली प्राथमिकता कोव्हिड परिस्थितीशी सामना करणे असेल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. शपथ घेतल्यानंतर लगेचच त्यांनी सर्व राजकीय पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

 • Share this:
  कोलकाता, 05 मे: तृणमूल काँग्रेस (TMC) च्या सुप्रिमो ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यातील कोरोना स्थिती बिकट असतानाच राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांनी त्यांना राजभवनात आयोजित केलेल्या एका छोटेखानी समारंभात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ममता बॅनर्जी यांनी बंगाली भाषेत शपथ घेतली. या कार्यक्रमात पार्थ चटर्जी आणि सुब्रतो मुखर्जी यांच्यासारख्या टीएमसी नेत्यांव्यतिरिक्त निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर आणि टीएमसीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर आपली प्राथमिकता कोव्हिड परिस्थितीशी (Coronavirus Pandemic) सामना करणे असेल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. शपथ घेतल्यानंतर लगेचच त्यांनी सर्व राजकीय पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन केले. बंगालची प्रशासकीय यंत्रणा अलीकडे निवडणुकीच्या कामात अडकून पडली होती. आता लवकरच आम्ही सर्व अडचणींचा सामना करू, असे राजकीय हिंसाचारावर त्या म्हणाल्या. हे वाचा - LIVE : ममता बॅनर्जींनी घेतली तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ हिंसाचारावर राज्यपालांनी ममतांना काय म्हटले? ममतांच्या शपथविधी सोहळ्यावेळी राज्यपाल जगदीप धनखर म्हणाले की, 'निवडणुकांनंतर राज्यातील हिंसाचार संपविणे ही आपली पहिली प्राथमिकता आहे. मी तिसऱ्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्री ममताजींचे अभिनंदन करतो. आता हिंसाचार संपवणे ही आपली पहिली प्राथमिकता असेल. या हिंसाचाराचा समाजातील मोठ्या घटकावर परिणाम झाला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, मुख्यमंत्री तातडीने पुन्हा कायद्याचे राज्य प्रस्थापित करतील आणि हिंसाचार लवकरच आटोक्यात येईल.' हे वाचा - 'मराठा आरक्षणाचा कायदा कराच', मुख्यमंत्री ठाकरेंची मोदींना हात जोडून विनंती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट केले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल ममता दीदी यांचे अभिनंदन, असे पंतप्रधानांनी ट्वीट करून म्हटले. पश्चिम बंगालमध्ये 292 जागांवर झालेल्या निवडणुकांमध्ये तृणमूल कॉंग्रेसने 213 जागा जिंकल्या, तर भाजपला विधानसभेमधील आपले सदस्य तीन वरुन 77 पर्यंत वाढविण्यात यश आले आहे. भाजपकडून ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेची करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह या सारख्या भाजपच्या दिग्गज नेत्यांनी निवडणुक जिंकण्यासाठी मोठी ताकद लावली होती. मात्र, अखरे पश्चिम बंगालवर ममता बॅनर्जी यांचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले.
  Published by:News18 Desk
  First published: