कोरोनाचं औषध मिळालं! पतंजली योगपीठने आतापर्यंत हजारो पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केल्याचा दावा

कोरोनाचं औषध मिळालं! पतंजली योगपीठने आतापर्यंत हजारो पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केल्याचा दावा

पतंजली संशोधन संस्था लवकरच जगातील प्रतिष्ठित विज्ञान जनरल मध्ये हा पेपर प्रकाशित करणार आहे.

  • Share this:

हरिद्वार, 12 जून : कोरोनाशी लढा देणाऱ्यांसाठी ही बातमी कदाचित सर्वात उपयुक्त आहे. पतंजली योगपीठाने दावा केला आहे की, त्यांना कोविड - 19 ला रोखण्याचे औषध सापडले आहे आणि ते प्रभावीदेखील ठरले आहे. कोविड - 19 विषाणूविरोधात प्रभावी औषध आणि लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे.

भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनलॉक सुरू झाल्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे.  जर पतंजली योगपीठाचा दावा खरा ठरला तर देशातील लाखो लोकांना मोठी मदत मिळणार आहे. शिवाय अर्थव्यवस्थाही पुन्हा रुळावर येऊ शकेल.

यशस्वी प्रयोग

कोविड - 19 या विषाणूचे औषध बनविण्याचा दावा पतंजली योगपीठाचे सरचिटणीस आणि योग शिक्षक बाबा रामदेव यांचे सहयोगी आचार्य बाळकृष्ण यांनी केला आहे. आचार्य बालकृष्ण म्हणाले की, यावेळी कोरोना विषाणू भयावह स्थितीत आहे. कोरोना विषाणूचा शोध लागला तेव्हापासूनच पतंजली संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने त्याच्या औषधाचा शोध सुरू केला होता. ते म्हणाले की तुळस, अश्वगंधा तसेच अनेक प्रकारचे रस यांनी बनविलेले हे औषध हजारो कोरोना पॉझिटिव्ह लोकांवर वापरले गेले आहे. त्यांचा पाठपुरावा करण्यात आला असून ते सर्वजण बरे झाले आहेत.

जगासमोर करणार दावा

आचार्य बालकृष्ण म्हणाले की, आतापर्यंत पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटने त्यांच्या औषधाने बरे झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा डेटा तयार केला आहे. कोरोनामधील वेगवेगळ्या टप्प्यांचा आणि सर्व वयोगटातील लोकांचा डेटा आहे. यासह, शेकडो लोकांवर क्लिनिकल चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत

ते म्हणाले की, पतंजली संशोधन संस्था लवकरच जगातील प्रतिष्ठित विज्ञान जनरल मध्ये हा पेपर प्रकाशित करणार आहे. यासाठी तयारी सुरू केली आहे. वैद्यकीय विज्ञानात लोक जे काही पुरावे विचारतात त्यांना ते पुरवले जाणार आहेत.

हे वाचा-भारतीय डॉक्टरने अमेरिकेत इतिहास रचला; कोरोना रुग्णावर केली यशस्वी शस्त्रक्रिया

First published: June 12, 2020, 6:02 PM IST

ताज्या बातम्या