जाहिरात
मराठी बातम्या / देश / खूशखबर! 9 महिन्यानंतर स्वस्त झालं पेट्रोल, असे आहेत आजचे दर

खूशखबर! 9 महिन्यानंतर स्वस्त झालं पेट्रोल, असे आहेत आजचे दर

खूशखबर! 9 महिन्यानंतर स्वस्त झालं पेट्रोल, असे आहेत आजचे दर

चार महानगरांमध्ये राजधानी दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे सर्वात कमी दर आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 9 मार्च : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Prices Today) किंमतीत मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. देशातील प्रमुख महानगरांमध्ये सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या प्रति लिटर किंमतींमधून 23 ते 25 पैसे कमी केले असून डिझेलच्या किमतीमधून 25 ते 26 प्रति लिटर कमी करण्यात आले आहेत. यानंतर नवी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमती 70.59 रुपये झाली असून एक लिटर डिजेलच्या किंमतीत 63.22 रुपये खर्च करावे लागणार आहे. तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल करतात. चार महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे भाव इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 70.59 रुपये, कोलकात्यात 73.28 रुपये, मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 76.29 रुपये आणि चेन्नईत 73.33 रुपये झाली आहे. तर दुसरीकडे डिझेलच्या किंमतीही कमी झाल्या आहेत. राजनाधी दिल्लीत एक लिटर डिझेलसाठी 63.26 रुपये, कोलकात्यात 65.65 रुपये, मुंबईत 66.24 रुपये तर चेन्नईत 66.75 रुपये आकारले जात आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये 10 टक्क्यांची घसरण दोन दिवसांपूर्वी (शुक्रवारी) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीमध्ये 10 टक्क्यांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. OPEC देशांनी प्रोडक्शनमध्ये कपात न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या कारणामुळे भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रति लिटर 4 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. US WTI आणि ब्रेंट क्रुड (Brent Crude Oil) च्या दरातही घट झाली आहे. दोन्ही कच्च्या तेलांची किंमत क्रमश: 10.07 % आणि 9.4 टक्क्यांनी उतरली आहे. ओपेक आणि त्यांच्या सहकारी देशांच्या बैठकीमध्ये  क्रुड प्रोडक्शनमध्ये कपात करण्यावर निर्णय झाला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात