• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • पाचही खंडात रंगणार 'ग्लोबल पुलोत्सव'

पाचही खंडात रंगणार 'ग्लोबल पुलोत्सव'

भारतातील 20 प्रमुख शहरात तर भारताबाहेर 5 खंडांमधल्या 30 शहरात अशा 50 ठिकाणी हा महोत्सव रंगणार आहे. पु .ल परिवार, आशय सांस्कृतिक पुण्यभूषण प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय.

  • Share this:
15 मार्च : पु. ल. देशपांडे म्हणजे मराठी वाचकांच्या गळ्यातला ताईत. आपल्या आयुष्यातले ताण त्यांच्या पुस्तकांनी दूर केले. सगळ्यांना मनमुराद हसवणाऱ्या पुलंचा सन्मान जगभरात होतोय. पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 8 नोव्हेंबर 2018 ते 8 नोव्हेंबर 2019 हे पूर्ण वर्ष ग्लोबल पुलोत्सव साजरा करण्यात येणार आहे. भारतातील 20 प्रमुख शहरात तर भारताबाहेर 5 खंडांमधल्या 30 शहरात अशा 50 ठिकाणी हा महोत्सव रंगणार आहे. पु .ल परिवार, आशय सांस्कृतिक पुण्यभूषण प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यात आज ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या हस्ते लोगोचं प्रकाशन करण्यात आलं. या ग्लोबल पुलोत्सवात सुमारे 500 कलाकार, साहित्यिक सहभागी होणार आहेत. कुठे कुठे होणार ग्लोबल पुलोत्सव? महाराष्ट्रात पुणे, मुंबई, ठाणे, सांगली - मिरज, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, अमरावती, यवतमाळ, पिंपरी-चिंचवड - महाराष्ट्राबाहेर बेळगाव, इंदोर, बडोदा, बंगळूरु, हैदराबाद, हैदराबाद, दिल्ली - युरोप, आशिया, अमेरिका, अफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडात कार्यक्रम - युरोपमध्ये लंडन, नेदरलँड्स, म्युनिच -आशियामध्ये दुबई, सिंगापूर, मॉरिशस, बँकॉक, मलेशिया, कतार, अबुधाबी -अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को, सॅन होजे, ऑस्टिन, वॉशिंग्टन, अटलांटा, बोस्टन, कॅलिफोर्निया, राले, न्यूयॉर्क, सिअॅटल, शिकागो, ह्यूस्टन, शिकागो, लॉस एंजलिस, फ्लोरिडा - कॅनडामध्ये मॉन्ट्रियल, टोरँटो, वानोव्हर -अफ्रिकेत नैरोबी, टांझानिया, जोहान्सबर्ग -ऑस्ट्रेलियात सिडनी, मेलबर्न आणि ऑकलन्ड
First published: