रायपूर (छत्तीसगड), 6 जून : छत्तीसगड राज्याची राजधानी रायपूर येथे आंतरराष्ट्रीय स्विमिंग पूलमध्ये (International Swimming Pool) महिलांच्या विनयभंगाचे (Woman Molestation) प्रकरण समोर आले आहे. यानंतर स्विमिंग पूल सील करण्यात आला आहे. राजधानीतील जीई रोडवर असलेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात प्रशिक्षण घेणाऱ्यांनी येथील महिलांशी होणाऱ्या गैरवर्तनावरून एकच गोंधळ घातला. नेमकं काय घडलं - पोहण्याचे प्रशिक्षण (Swimming Training) घेण्यासाठी आलेल्या मुलीबाबत येथे काम करणाऱ्या एका प्रशिक्षकाने आपल्याच भावासमोर आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यानंतर मुलीच्या भावाने आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर तरुणीच्या नातेवाईकांसह आणि काही जणांनी स्विमिंग पूल येथे जाऊन गोंधळ घातला. यादरम्यान आंतरराष्ट्रीय स्विमिंग पूलमध्ये राज्यस्तरीय चॅम्पियनशिपसाठी चाचण्या सुरू होत्या. दरम्यान, पोलिसांनीही येथे पोहोचून सर्वांना येथून हाकलून लावले. स्विमिंग पूल चालकाकडून नियम पाळले जात नसल्याची तक्रारही मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे. त्याचबरोबर येथे प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांचाही पुरुष प्रशिक्षकांकडून विनयभंग केला जातो. यानंतर पालिकेच्या पथकाने येथे येऊन प्रशिक्षण व नियमांची माहिती घेत तीन दिवसांपासून पूल सील केला. हेही वाचा - MP News : भुंकणाऱ्या कुत्र्याला हाकललं, कुत्र्याच्या मालकाने उचललं धक्कादायक पाऊल फक्त एकच महिला प्रशिक्षक - हा स्विमिंग पूल रायपूर महापालिकेच्या अखत्यारीत येतो. मात्र, तो खासगी कंत्राटावर देण्यात आला आहे. त्याचबरोबर नियमानुसार 10 जणांमध्ये एक प्रशिक्षक असणे आवश्यक आहे. मात्र, 100 महिला व मुलांना शिकवण्यासाठी एकच महिला प्रशिक्षक आहे. बाकीचे प्रशिक्षक पुरुषच आहेत. येथे 700 हून अधिक लोकांची नोंदणी आहे. त्यातुलनेत फारच कमी प्रशिक्षक आहेत. पालिका अधिकाऱ्यांनी नियम डावलून चालविण्यात येणारा हा स्विमिंग पूल आठ जूनपर्यंत सील केला आहे. त्याचबरोबर यंत्रणा सुधारली नाही तर यापुढेही सीलबंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.