जाहिरात
मराठी बातम्या / देश / काय सांगता...? ‘या’ ठिकाणी केली जाते चक्क भुताची पूजा! काय आहे प्रकार?

काय सांगता...? ‘या’ ठिकाणी केली जाते चक्क भुताची पूजा! काय आहे प्रकार?

भूतांची पूजा

भूतांची पूजा

ही ‘भूत पूजा’ सर्रास केली जाते

  • -MIN READ Local18 West Bengal
  • Last Updated :

    मयंक देबनाथ, प्रतिनिधी नादिया, 18 एप्रिल : वैशाख महिना सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच पश्चिम बंगालच्या शांतीपूर पोलीस स्टेशन परिसरातील फुलिया तालतळा येथे भूत पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. ‘भूत पूजे’शी संबंधित असलेल्या या जत्रेत पश्चिम बंगालमधील फुलियासह शांतीपूर, राणाघाट आणि हबीबपूर येथील अनेक लोक सहभागी झाले होते.

    News18लोकमत
    News18लोकमत

    स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ‘भूत पूजा’ बांगलादेशातही सर्रास केली जाते. पण, 1950 ते 1952 च्या फाळणीदरम्यान अनेक लोक पूर्व पाकिस्तानातून आले आणि फुलिया भागात राहू लागले. भारतात आल्यानंतर तेथील लोकांनी येथेही तीच प्रथा पाळायला सुरुवात केली. सध्या बांगलादेशात भूतपूजेची ही प्रथा जवळजवळ नाहीशी झाली आहे. सहसा या पूजेची सुरुवात चैत्र महिन्याच्या सुरुवातीपासून होते. संन्यासी शिव स्तोत्र म्हणत सर्व परिसराला प्रदक्षिणा घालतात. तांदूळ, कडधान्यं, धान्यं इत्यादींचा समावेश असलेला ‘भुक्ता’ वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळा केला जातो आणि दिवसाच्या शेवटी ते एका जागी बसून त्या सर्व गोष्टी शिजवून खातात. दरवर्षी स्थानिक गावातील रहिवासी स्वतःच्या हातानं भुताची मूर्ती बनवतात. या मूर्तीला डोकं किंवा मान नाही. पण, डोळे, नाक, तोंड इत्यादी अवयव शरीराच्या थोड्या खालच्या बाजूला असतात. जमिनीवर विसावलेल्या या मूर्तीची वर्षाच्या सुरुवातीला पूजा केली जाते. काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ही पूजा पाचव्या शतकात एका यादव संन्याश्याच्या हातून सुरू झाली. वर्षाच्या सुरुवातीला या पूजेभोवती जत्रा भरते. ‘भूत पूजे’मध्ये स्थानिकांची गर्दी जमा होते. पण, या उत्सवात धूमकेतूच्या पुतळ्याची पूजा का केली जाते याचं अचूक स्पष्टीकरण कोणीही देऊ शकत नाही. स्थानिकांनी सांगितलं की, “या पूजेचं नेमकं कारण कोणीही सांगू शकत नाही. पण ‘भूत पूजा’ ही सर्वसाधारणपणे शंकराला प्रसन्न करण्यासाठी केली जाते, असं म्हणतात. वाईट ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी आणि चांगल्या उर्जेचे आवाहन करण्यासाठी ही पूजा बंगाली नववर्षाच्या सुरुवातीला केली जाते.” स्थानिक रहिवासी नानी गोपाल बसाक म्हणाले, “ही पूजा 55 ते 56 वर्षांपूर्वी सुरू झाली होती. लहानपणापासून मी या पूजेभोवती अशीच गर्दी पाहतोय. लोक येथे येतात त्यांना जे पाहिजे ते मिळतं. कित्येक वर्षांपासून या पूजेची लोकप्रियता जशी होती तशीच आहे.” भारतात अनेक ठिकाणी देवांच्या पूजा केल्या जातात. रावणाचीही भारतात पूजा होते त्याप्रमाणेच भुताचीही पूजा होते. ज्याच्या त्याच्या विचारांनुसार जो-तो समाज आपल्या चालीरिती पाळतो आणि आनंदाने राहतो हेच भारताचं वैशिष्ट्य आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात