जाहिरात
मराठी बातम्या / देश / गौतम गंभीरला सगळ्यात मोठा धक्का, त्या प्रकरणात आढळला दोषी

गौतम गंभीरला सगळ्यात मोठा धक्का, त्या प्रकरणात आढळला दोषी

गौतम गंभीरला सगळ्यात मोठा धक्का, त्या प्रकरणात आढळला दोषी

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या अडचणीत वाढ झाली आहे. गौतम गंभीरने कोरोनाच्या औषधांची साठेबाजी केली आणि त्याचं वितरण केल्याचं दिल्ली सरकारच्या ड्रग्स कन्ट्रोलरनी गुरुवारी हायकोर्टात सांगितलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 जून : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या अडचणीत वाढ झाली आहे. गौतम गंभीरने कोरोनाच्या औषधांची साठेबाजी केली आणि त्याचं वितरण केल्याचं दिल्ली सरकारच्या ड्रग्स कन्ट्रोलरनी गुरुवारी हायकोर्टात सांगितलं. तसंच गौतम गंभीरवर कारवाई करण्याच यावी, अशी मागणीही ड्रग्स कन्ट्रोलरनी हायकोर्टात केली. दिल्ली सरकारच्या ड्रग्स कन्ट्रोलरनी दिल्ली हायकोर्टात सांगितलं की, ‘गौतम गंभीर फाऊंडेशनने कोरोना रुग्णांसाठी वापरलं जाणारं फॅबिफ्लू औषधाची अनधिकृतरित्या साठेबाजी केली. गौतम गंभीर औषधाच्या खरेदी आणि वितरणामध्ये दोषी आढळला आहे.’ फाऊंडेशन आणि औषधांच्या डिलरवर वेळ न दवडता कारवाई करण्यात यावी, असंही ड्रग्स कन्ट्रोलरने दिल्ली हायकोर्टात सांगितलं. हायकोर्टाने ड्रग्स कन्ट्रोलरला 6 आठवड्यांमध्ये अशाच प्रकरणांच्या स्थितीचा रिपोर्ट द्यायला सांगितला आहे. याची पुढची सुनावणी आता 29 जुलैला होणार आहे.

जाहिरात

दिल्ली हायकोर्टातली ही सुनावणी संपल्यानंतर गौतम गंभीर याने भगतसिंग यांचं विधान ट्वीट केलं आहे. मी काहीही चूक केलेली नाही, जनतेच्या भल्यासाठी मी जे करू शकतो ते मी केलं आहे, असं गंभीर म्हणाला. ‘मी एक माणूस आहे, माणसाला जे प्रभावित करतं, ते मला चिंतेत टाकतं- सरदार भगत सिंग’ असं ट्वीट गंभीरने केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात