मराठी बातम्या /बातम्या /देश /

'गांधी Vs गोडसे' नावाच्या वेब सीरिजचं शूटिंग बंद पाडलं; पोलिसांनी सांगितलं हे कारण

'गांधी Vs गोडसे' नावाच्या वेब सीरिजचं शूटिंग बंद पाडलं; पोलिसांनी सांगितलं हे कारण

रविवारी टाळेबंदी असतानाही गांधी Vs गोडसे (Gandhi Vs Godse web series) या वेब सिरीजचे चित्रीकरण सुरू होतं. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत हे चित्रीकरण बंद पाडलं.

रविवारी टाळेबंदी असतानाही गांधी Vs गोडसे (Gandhi Vs Godse web series) या वेब सिरीजचे चित्रीकरण सुरू होतं. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत हे चित्रीकरण बंद पाडलं.

रविवारी टाळेबंदी असतानाही गांधी Vs गोडसे (Gandhi Vs Godse web series) या वेब सिरीजचे चित्रीकरण सुरू होतं. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत हे चित्रीकरण बंद पाडलं.

  • Published by:  News18 Desk

भोपाळ, 20 जून : कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी अजून पूर्णपणे टाळेबंदी उठवण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणी शनिवारी-रविवारी कडक टाळेबंदी पाळण्यात येते. आज रविवारी टाळेबंदी असतानाही गांधी Vs गोडसे (Gandhi Vs Godse web series) या वेब सिरीजचे चित्रीकरण सुरू होतं. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत हे चित्रीकरण बंद पाडलं.

मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये हे वेब सिरीजचे (web series) चित्रीकरण सुरू होतं. वेब सिरीजचे शूटिंग चालू असल्याची माहिती मिळाल्यानं आजूबाजूच्या परिसरातील बरेच लोक शूटिंग पाहण्यासाठी जमले होते. या सर्वांना पोलिसांनी पिटाळून लावलं आणि शूटिंग आयोजित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रविवारी शूटिंग करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती, भोपाळच्या चिनार पार्क येथे हे शूटिंग चालू होतं.

या वेब सिरीजच्या शूटिंगचे आयोजक वैभव सक्सेना यांना या प्रकरणात मुख्य आरोपी ठरविण्यात आलं आहे. गांधी Vs गोडसे या वेब सिरीजचे निर्माता आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे आहेत. शूटिंग वेळी ते उपस्थित नव्हते त्यांच्या टीमद्वारे हे शूटिंग सुरू होतं. पोलिसांनी शूटिंगसाठी उपस्थित असलेल्या सर्वांना पकडून पोलीस ठाण्यात नेलं आहे. टाळेबंदी असल्याने सध्या शूटिंग करण्यास परवानगी नाही आणि परवानगी न घेताच शूटिंग चालू असल्याने पोलिसांनी कारवाई केली.

संतोषी यांनी जानेवारीत शिवराज यांची घेतली होती भेट

राजकुमार संतोषी यांनी यावर्षी 31 जानेवारी रोजी भोपाळ येथे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली होती. या दरम्यान संतोषी यांच्यासमवेत भाजपचे खासदार आणि अभिनेता सनी देओल देखील उपस्थित होते. त्याच वेळी संतोषी यांनी गेल्या वर्षी 15 डिसेंबरला गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची भेट घेतली होती.

हे वाचा - 9 कोटी रुपयांच्या लग्जरी कारवर चालवला बुलडोझर, 21 कार चक्काचूर; PHOTOS पाहून धक्का बसेल

यानंतर नरोत्तम यांनी ट्वीट केले होते की, सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक राजकुमार संतोषी पुढील वर्षी भोपाळमध्ये तीन चित्रपटांचे शूटिंग करतील. इथं फिल्म अ‍ॅकॅडमी सुरू करण्याबाबत त्यांचा विचार आहे, त्यांनी भेट घेतली आहे आणि चर्चा केली आहे. राज्यातील कलाकार आणि कलावंतांना चित्रपटांत संधी देण्याचा मी त्यांना आग्रह केला आहे.

First published:

Tags: Bhopal News, Shooting, Web series