Home /News /national /

ओबामा बनवतात उत्तम आमटी आणि खिमा, मित्रांनी शिकवली होती त्यांना रेसिपी

ओबामा बनवतात उत्तम आमटी आणि खिमा, मित्रांनी शिकवली होती त्यांना रेसिपी

आपलं पुस्तक A Promised Land च्या प्रकाशनावेळी त्यांनी या संदर्भातला किस्सा शेअर केला आहे.

    नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची राजकीय कारकीर्द चांगलीच चर्चेचा विषय ठरली. साधी राहणी आणि लोकांशी थेट संवाद यामुळे त्यांना मोठी लोकप्रियता लाभली. अशातच ओबामा यांच्या नव्या पुस्तकातून त्यांच्याविषयीचा आणखी एक पैलू समोर आला आहे. मला आमटी आणि खिमा अतिशय उत्तम बनवता येत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं असून आपलं पुस्तक A Promised Land च्या प्रकाशनावेळी त्यांनी या संदर्भातला किस्सा शेअर केला आहे. त्याचबरोबर भारतासंबंधी आपले आकर्षणदेखील सांगितले. ओबामा यांनी भारताविषयी बोलताना सांगितले की, भारताबद्दल त्यांच्या मनात नेहमीच वेगळा आदर आहे. त्यांच्या लहानपणी ते इंडोनेशियात राहत असताना महाभारत आणि रामायणाविषयी त्यांनी खूप ऐकलं आहे. 2010 मध्ये राष्ट्रपती असताना त्यांनी भारताचा अधिकृत दौरा केला होता. याआधी त्यांनी कधीही भारताला भेट दिली नव्हती, असे त्यांनी सांगितले. परंतु माझ्या मनामध्ये भारताविषयी खूप आदराची आदराची आणि वेगळी भावना आहे. लहानपणी मी इंडोनेशियात राहत असताना महाभारत आणि रामायणाविषयी त्यांनी खूप ऐकलं आहे. कदाचित त्यामुळे किंवा पूर्वेकडील भागाकडे माझा कल जास्त असल्यामुळे किंवा पाकिस्तानी आणि भारतीय मित्रांच्या ग्रुपमध्ये राहिल्याने माझ्या मनात भारताविषयी वेगळी भावना आहे. या कॉलेजच्या मित्रांनीच मला आमटी आणि खिमा बनवायला शिकवलं असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर बॉलिवूड सिनेमाही मला आवडले, असं ते म्हणाले. 2017 मध्ये डिसेंबरमधील त्यांच्या भारत दौऱ्यावेळी देखील ओबामा यांनी आमटी आणि खिमा बनवण्याचा हा किस्सा शेअर केला होता. तसंच आमटी बनवणारा कदाचित मी पहिला अमेरिकी अध्यक्ष असेन असंही ते गंमतीने म्हणाले होते. पोळी तयार करणं खूप अवघड असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते. 2013 मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीवेळीही त्यांनी एका पाकिस्तानी मित्राच्या आईकडून खिमा आणि आमटी बनवायला शिकल्याचे म्हटले होते. राहुल गांधींविषयी वक्तव्य आणि वाद बराक ओबामा यांच्या पुस्तकात राहुल गांधी यांच्याविषयी देखील भाष्य करण्यात आले आहे. यामध्ये ओबामा यांनी राहुल गांधीकडे गुणवत्तेची कमी असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर गांधी वंशजांचे गुण त्यांच्याकडे नसल्याचे देखील त्यांनी आपल्या A Promised Land या पुस्तकात म्हटलं आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या पुस्तकात राहुल गांधी यांची तुलना एका विद्यार्थ्याशी केली आहे. हा विद्यार्थी कोर्स पूर्ण करून आपल्या शिक्षकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्याच्याकडे गुणवत्ता नाही, असं त्यांनी म्हटल्याचं न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीत म्हटलं होतं.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: President barak Obama

    पुढील बातम्या