नवी दिल्ली, 5 एप्रिल : डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (डीपीएपी) अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी बुधवारी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. न्यूज 18 चे व्यवस्थापकीय संपादक अमिश देवगण यांच्याशी खास संवाद साधताना आझाद म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जवळचे लोक त्यांचे विरोधक आहेत आणि त्यांनी जे केले त्यामुळे आज त्यांना शिक्षा झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री आझाद यांनी राहुल गांधी यांच्या’मोदी आडनाव’ विधानाबद्दल माफी मागण्यास नकार दिल्याबद्दल राहुल गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, सर्व गांधींनी माफी मागितली आहे, इंदिरा गांधींनीही माफी मागितली आहे. अगदी महात्मा गांधीही खूप उदारमतवादी होते, त्यांनी त्यांचा दौरा रद्द केला होता. राहुल गांधींनी ‘मोदी आडनाव’ याबाबतच्या त्यांच्या विधानाबद्दल माफी मागण्यास नकार दिला होता. 2019 मध्ये त्यांनी केलेल्या विधानाबद्दल, त्यांना 23 मार्च रोजी सूरतचे मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने दोषी ठरवले आणि दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले. दरम्यान, काँग्रेस पक्ष आपल्या वरिष्ठ नेत्यांचे ऐकत नाही, असेही आझाद म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर आपण निवडणूक हरणार असे वाटून काँग्रेस घरी बसली, अशी टीकाही त्यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.