10 ऑगस्ट रोजी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ट्विट करुन त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितलं होतं. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होतं की, 'दुसऱ्या कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला कोरोनाची लागण झाली असल्याचं आढळलं. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कृपया स्वत:ला विलगीकरणात ठेवावं तसंच आपली कोविड चाचणी करावी अशी विनंती आहे'Former President Pranab Mukherjee passes away, announces his son Abhijit Mukherjee. pic.twitter.com/3SFxmRE21j
— ANI (@ANI) August 31, 2020
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी पश्चिम बंगला येथील बिरभूम येथे झाला. पाच दशकांहून अधिक त्यांची राजकीय कारकिर्द आहे. प्रणव मुखर्जी यांनी 2012 ते 2017 पर्यंत राष्ट्रपती पद भूषवलं होतं. ते देशाचे तेरावे राष्ट्रपती होते.Mukherjee left indelible mark on India's development trajectory; scholar par excellence, towering statesman, admired by all: Modi
— Press Trust of India (@PTI_News) August 31, 2020
25 जुलै 2012 ला राष्ट्रपतीपदाची घेतली शपथ घेतली होती. त्यांनी परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, वाणिज्य मंत्री आणि अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. इतिहास, राज्यशास्त्र, कायदा या क्षेत्रातलं पद्व्युत्तर शिक्षण घेतलं असून इंदिरा गांधी यांच्या काळात प्रणव मुखर्जी अनेक महत्वाच्या पदावर होते. अनेक महत्त्वाच्या खात्यांचं त्यांनी काम पाहिलं आहे. प्रणव मुखर्जी यांचं आत्मचरित्र खूप गाजलं होतं. काही वर्षांपूर्वी प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानं अनेक वादंग निर्माण झाला होता. प्रणव मुखर्जींबद्दल महत्त्वाचे- - आय एम एफ, वर्ल्ड बॅंक, एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या संचालक मंडळातही होते - भारतीय अर्थव्यवस्थेवर अनेक पुस्तकांचं लेखन - 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मान - प्रणव मुखर्जी वादळी व्यक्तिमत्त्व - 1969 पासून पाच वेळा राज्यसभेत तर 2004 पासून दोनदा लोकसभेवर निवड - 23 वर्ष कॉंग्रेस कार्यकारिणीत सदस्य - अमोघ वक्तृत्वाची देण - गाडगीळ मुखर्जी फॉर्म्युलाचे संस्थापक - 1982 मध्ये इंदिरा गांधींच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्रीपदाचा पदभार स्विकारला - 1980 ते 1985 पर्यंत राज्यसभेत - 1991 से 1996 पर्यंत योजना आयोगाचे उपाध्यक्ष - 1993 से 1995 पर्यंत वाणिज्य मंत्री - 1995 ते 1996 पर्यंत परराष्ट्र मंत्री - 2004 से 2006 पर्यंत संरक्षण मंत्री - 2006 ते 2009 पर्यंत परराष्ट्र मंत्री - 2009 से 2012 पर्यंत अर्थमंत्रीIndia grieves the passing away of Bharat Ratna Shri Pranab Mukherjee. He has left an indelible mark on the development trajectory of our nation. A scholar par excellence, a towering statesman, he was admired across the political spectrum and by all sections of society. pic.twitter.com/gz6rwQbxi6
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.