नवी दिल्ली, 19 मे: कोरोनाच्या संसर्गात भारताने अनेक नागरिकांना गमावले आहेत. यामध्ये राजकीय नेते, अधिकारी, कलाकारांचाही समावेश आहे. आता अशाच एका अधिकाऱ्याचं कोरोनामुळे निधन झालं आहे. राष्ट्रीय सुरक्षा गार्ड म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG)चे माजी प्रमुख जे. के. दत्त यांचं कोरोनाने निधन झालं आहे. 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी एनएसजी कमांडोजचं नेत्रृत्व जे के दत्त यांनी केलं होतं. दहशतवाद्यांशी लढत त्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या जे के दत्त यांची मात्र, कोरोना विरुद्धची लढाई अपयशी ठरली आहे.
Jyoti Krishan Dutt IPS, former DG NSG (Aug 2006-Feb 2009) passed away in Gurugram, today. NSG condoles his untimely demise. He will always be remembered for his leadership during Operation Black Tornado (Mumbai 2008): National Security Guard (NSG) pic.twitter.com/l1U2ypqah4
— ANI (@ANI) May 19, 2021
सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी जे के दत्त यांची ऑक्सिजन पातळी कमी होण्यास सुरुवात झाल्यावर त्यांना 14 एप्रिल रोजी गुडगाव येथील मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज त्यांचे निधन झाले. ज्योति कृष्णा दत्त हे 2006 ते 2009 या कालावधीत एनएसजीचे प्रमुख होते. ते सीबीआयचे सहसंचालक सुद्धा होते. जेके दत्त यांच्या निधनाबद्दल एनएसजीने ट्विट करत म्हटलं, ज्योति कृष्ण दत्त (आयपीएस, माजी डीजी, एनएसजी - ऑगस्ट 2006 - फेब्रुवारी 2009) यांचं 19 मे रोजी गुरुग्राममध्ये निधन झालं. त्यांच्या अकाली निधनाबद्दल एनएसजीने शोक व्यक्त केला.