• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • मोठी बातमी: माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला जीवे मारण्याची दहशतवादी संघटनेची धमकी!

मोठी बातमी: माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला जीवे मारण्याची दहशतवादी संघटनेची धमकी!

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गंभीरनं दिल्ली पोलिसांकडं याबाबत तक्रार दाखल केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ISIS काश्मीर या दहशतवादी संघटनेनं ही धमकी दिली आहे. (Gautam Gambhir has received death threats from ISIS Kashmir) या प्रकरणात गंभीरनं दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. गंभीरच्या या तक्रारीनंतर त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गंभीरनं मंगळवारी रात्री ही तक्रार दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती डीसीपी सेंट्रल श्वेता त्रिपाठी यांनी दिली आहे. ISIS काश्मीर या दहशतवादी संघटनेनं ईमेल आणि फोनच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार गंभीरनं केली आहे. 2007 साली झालेला T20 वर्ल्ड कप आणि 2011 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमधील विजयात गंभीरची मोठी भूमिका होती. या दोन्ही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये त्यानं टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन केले होते. गंभीरनं 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला. सध्या तो पूर्व दिल्लीचा (East Delhi) भाजपा खासदार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: