जाहिरात
मराठी बातम्या / देश / Big News: चारा घोटाळा प्रकरणात लालू यादव दोषी, 21 फेब्रुवारीला शिक्षा सुनावणार

Big News: चारा घोटाळा प्रकरणात लालू यादव दोषी, 21 फेब्रुवारीला शिक्षा सुनावणार

संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी (Biggest News) झारखंडची (Jharkhand) राजधानी रांचीमधून (Ranchi) येत आहे. जिथे सीबीआयच्या विशेष न्यायालयानं (CBI Special Court) सर्वात मोठ्या चारा घोटाळ्याप्रकरणी (Fodder Scam) म्हणजेच डोरंडा ट्रेझरीमधून बेकायदेशीर पैसे काढल्याप्रकरणी निकाल दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

रांची, 15 फेब्रुवारी: आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी (Biggest News) झारखंडची (Jharkhand) राजधानी रांचीमधून (Ranchi) येत आहे. जिथे सीबीआयच्या विशेष न्यायालयानं (CBI Special Court) सर्वात मोठ्या चारा घोटाळ्याप्रकरणी (Fodder Scam) म्हणजेच डोरंडा ट्रेझरीमधून बेकायदेशीर पैसे काढल्याप्रकरणी निकाल दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आले आहे. मात्र या प्रकरणातील शिक्षा अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या प्रकरणी लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना किती वर्षांची शिक्षा होणार किंवा त्यांना जामीन मिळणार की नाही याचा निर्णय 21 फेब्रुवारीला होणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद यांना दोषी ठरवण्यात आले आहे. तर इतर 24 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर 34 जणांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव यांच्यासह 41 जणांवर न्यायालय आता 21 फेब्रुवारीला निकाल देणार आहे. याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपींच्या शिक्षेच्या मुद्यावर सुनावणी सुरू आहे.

जाहिरात

काय आहे संपूर्ण प्रकरण झारखंडमधील चारा घोटाळ्याच्या एकूण पाच प्रकरणांमध्ये लालू प्रसाद यादव यांना आरोपी बनवण्यात आलं होतं. याआधी चार प्रकरणांचा निकाल देण्यात आला असून या सर्व प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. मंगळवारी ज्या पाचव्या प्रकरणाचा निकाल लागणार आहे तो रांचीच्या डोरंडा येथील ट्रेझरीमधून 139.5 कोटी रुपये बेकायदेशीर काढण्याशी संबंधित आहे. 1996 मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यात सुरुवातीला एकूण 170 जण आरोपी होते. यातील 55 आरोपींचा मृत्यू झाला आहे, तर सात आरोपींना सीबीआयनं सरकारी साक्षीदार बनवलं आहे. न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला. आतापर्यंत सहा आरोपी फरार आहेत. उर्वरित 99 आरोपींवरील निर्णय येणं बाकी आहे. हे आहेत चारा घोटाळा प्रकरणातले आरोपी या प्रकरणातील इतर प्रमुख आरोपींमध्ये माजी खासदार जगदीश शर्मा, डॉ आर के राणा, तत्कालीन बिहार पशुसंवर्धन सचिव बेक ज्युलियस आणि पशुसंवर्धन विभागाचे सहायक संचालक केएम प्रसाद यांचा समावेश आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सीबीआयच्या विशेष न्यायालयात सरकारी वकिलांच्या वतीने एकूण 575 जणांची साक्ष घेण्यात आली. तर बचाव पक्षातर्फे 25 साक्षीदार हजर करण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ranchi
  • First Published :
जाहिरात
जाहिरात