मुंबई, 6 जुलै : भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) इतिहासात एका वडिल-मुलीच्या जोडीने नुकताच इतिहास रचला आहे. आहे. एअर कमोडोर संजय शर्मा (Air Commodore Sanjay Sharma) आणि त्यांची मुलगी फ्लाईंग ऑफिसर अनन्या शर्मा (Flying Officer Ananya Sharma) यांनी एकच फायटर फॉर्मेशन हॉक 132 सारखे मोठे लढाऊ विमान उडवले. या बाप-लेकीच्या कौतुकाची पोस्ट कालपासून (5 जुलै 22) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, ही बातमी खरी असली तरी आताची नसल्याचं हवाई दलाकडून स्पष्ट करण्यात आलंय. या बापलेकीच्या जोडीने 30 मे 22 रोजी भारतीय हवाई दलाच्या कर्नाटकातील बिदर इथल्या स्टेशनवर हॉक-132 विमानाने फॉर्मेशनसाठी उड्डाण केलं होतं. फ्लाइंग ऑफिसर अनन्या लढाऊ विमान विषयात पदवी प्राप्त करण्यापूर्वी तिचं प्रशिक्षण घेत आहे. या बापलेकीचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या गुजरात विभागाने एक ट्वीट शेअर करत ही घटना पाच आठवड्यांपूर्वीची असल्याचं म्हटलंय. “वडील आणि त्यांची मुलगी एका मोहिमेसाठी एकाच लढाऊ फॉर्मेशनचा भाग झाली, अशी कोणतीही घटना या पूर्वी भारतीय हवाई दलाच्या इतिहासामध्ये घडलेली नाही. एअर कमोडोर संजय शर्मा आणि फ्लाइंग ऑफिसर अनन्या यांचं नातं वडील आणि मुलगी म्हणून दृढ आहेच; पण हे दोघेही हवाईदलाचे कॉम्रेड आहेत आणि को-विंगमन म्हणून दोघांचाही एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे,” असं म्हणत हवाई दलाने या बापलेकीचे फोटो शेअर केले आहेत. बातमी जुनी असली तरी या बापलेकीच्या जोडीवर होणाऱ्या कौतुकास ते पात्र आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या संदर्भात ‘हिंदुस्थान टाईम्स’नं वृत्त दिलंय.
#fatherdaughter duo created #history on 30 May 2022
— PRO Defence Gujarat (@DefencePRO_Guj) July 5, 2022
Flew in same formation of Hawk-132 ✈ at #AirForce Stn Bidar, where Flying Officer Ananya Sharma is undergoing training before graduating 🎓
onto faster & more superior fighter aircraft of @IAF_MCC@TwitterIndia @AviationWeek pic.twitter.com/72LyWRZFpo
रिपोर्ट्सनुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बीटेक पूर्ण केल्यानंतर अनन्याची आयएएफमध्ये प्रशिक्षणासाठी (Indian Air Force) निवड झाली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिची फाईट पायलट म्हणून निवड झाली होती. तर तिचे वडील एअर कमोडोर संजय शर्मा 1989 पासून हवाई दलाच्या फायटर स्ट्रीममध्ये सेवा देत आहेत. अनन्या शर्मा (Ananya Sharma) सध्या भारतीय वायुसेनेच्या अत्याधुनिक फायटर एअरक्राफ्ट विषयामध्ये पदवीधर होण्यासाठी बिदरमध्ये (Bidar) प्रशिक्षण घेत आहेत. ब्रिटिश सरकारमध्येही बंड? 2 मंत्र्यांचा अचानक राजीनामा एअर कमोडोर संजय शर्मा आणि त्यांची मुलगी फ्लाइंग ऑफिसर अनन्या यांनी 30 मे रोजी एअर फोर्स स्टेशन बिदर येथे हॉक-132 फायटर जेटच्या एकाच फॉर्मेशनमध्ये उड्डाण केले होते. या बापलेकीच्या कामगिरीबद्दल हवाई दलातील अनेक माजी सैनिकांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं आणि हा भारतासाठी अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली होती.