नवी दिल्ली, 23 मार्च : Covid-19 च्या रुग्णांसाठी देशातलं पहिलं स्वतंत्र रुग्णालय सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजने (RIL) सुसज्ज केलं. मुंबई महापालिकेबरोबर सहकार्याने हे रुग्णालय खास Coronavirus बाधित रुग्णांसाठी सज्ज करण्यात आलं आहे, असं RIL च्या वतीने सांगण्यात आलं. या रुग्णालयात 100 बेडची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक बेडसाठी मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर रिलायन्सने सांगितलं की, “Covid-19 साठी भारतातलं हे पहिलं स्वतंत्र हॉस्पिटल आहे. यासाठीचा सगळा निधी रिलायन्स फाउंडेशच्या वतीने देण्यात आला आहे. कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना आवश्यक असलेल्या सगळ्या वैद्यकीय सुविधा इथल्या प्रत्येक बेडसाठी पुरवल्या जातील. त्यासाठी आवश्यक मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर, व्हेंटिलेटर, डायलिसीस मशीन, पेसमेकर, मॉनिटरिंग मशीन्स अशी सगळी सोय या रुग्णालयात करण्यात आली आहे.” महाराष्ट्र सरकारला दिले 5 कोटी कोरोनाप्रभावित प्रदेशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आवश्यक क्वारंटाइन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या वैद्यकीय मदतीसाठी कंपनीने महाराष्ट्र सरकारला 5 कोटी रुपयांचा निधी द्यायचा निर्णय घेतला आहे. हा निधी मुख्यमंत्री फंडात जमा होईल.
प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटसाठी तयारी रिलायन्सने सांगितलं की, पेसमेकर तयार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. दररोज 1 लाख पेसमेकर तयार व्हावेत, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. देशात या सुविधा कमी पडू नयेत असा यामागचा प्रयत्न असल्याचं कंपनीने सांगितलं. डिस्क्लेमर : News18lokmat.com हा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या Network18 मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या कंपनीचा भाग आहे. Network18 कंपनीची मालकी रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आहे.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








