30 मे : एका असामान्य जिद्दीचे हे आपल्या देशातील एकमेवद्वितीय असे उदाहरण म्हणजे प्रांजल पाटील. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी दृष्टी गमावलेली मात्र दिव्यदृष्टीच्या बळावर उल्हासनगरातील दृष्टिहीन विद्यार्थिनी प्रांजल पाटील उपजिल्हाधिकारी या पदावर विराजमान झाली आहे. तिने केरळातील एरनाकुलममध्ये पदभार स्वीकारला असून तिच्यावर चोहोबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. ‘प्रांजल’चे यश संबंध भारतातील मुलींसाठी प्रेरणादायी आहे. मागील वर्षी त्यांना भारतीय कस्टम सेवेत पद मिळाले परंतु जिद्दीच्या बळावर तिने आयएएसचे शिखर सर केले. प्रांजल पाटीलची संघर्षकथा - जळगावच्या मलकापूर तालुक्यातील वडजी मूळगाव - सध्या उल्हासनगरमध्ये स्थायिक - वयाच्या आठव्या वर्षी प्रांजलनं अपघातात गमावली दृष्टी - चांदीबाई कॉलेजमधून बारावीचं शिक्षण - मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून बीए - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एम.ए., एम.फिल. पी.एच.डी. - एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश - अंध विद्यार्थ्यांमधून महाराष्ट्रातून आयएएससाठी पात्र ठरणारी पहिली महिला - भारतीय रेल्वेनं त्यांची निवड नाकारली - कस्टम सेवेत नोकरी मिळाली मात्र तिने नाकारली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







