Home /News /national /

आता महिला CRPF जवानही करणार VVIP सुरक्षा, लवकरच ट्रेनिंग सुरू

आता महिला CRPF जवानही करणार VVIP सुरक्षा, लवकरच ट्रेनिंग सुरू

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला CRPF जवान (Female CRPF personel) या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची (Security of VVIP) जबाबदारी पार पाडताना दिसणार आहेत.

    नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला CRPF जवान (First Batch of women CRPF) या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची (Security of VVIP) जबाबदारी पार पाडताना दिसणार आहेत. आतापर्यंत केवळ पुरुष जवानच या कामी तैनात केले जात असत. मात्र यापुढे महिलांसाठीदेखील हे क्षेत्र खुलं झाल्यामुळे आता अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा पथकात महिलादेखील दिसणार आहेत. लवकरच ट्रेनिंगला सुरुवात खास VVIP नागरिकांच्या सुडारक्षेचं वेगळं ट्रेनिंग सीआरपीएफ जवानांना दिलं जातं. मात्र आतापर्यंत महिलांना अशा प्रकारे सीआरपीएफकडून ट्रेनिंग दिलं जात नसे. आता मात्र महिलांसाठीदेखील हे क्षेत्र खुलं करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. लवकरच महिलांच्या पहिल्या बॅचचं ट्रेनिंग सुरू होणार असून या बॅचमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी तैनात केलं जाणार आहे. पहिल्या बॅचमध्ये 33 महिलांचा समावेश असेल, अशी माहिती सीआरपीएफच्या वतीनं देण्यात आली आहे. गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या बॅचमध्ये 33 महिलांचं प्रशिक्षण केलं जाणार असून त्यांच्या 6 प्लॅटून तयार केल्या जाणार आहेत. त्यानंतर आवश्यकतेनुसार या बॅचमधील महिलांना सुरक्षेच्या कामी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आगामी काळात देशातील काही राज्यांमध्ये निवडणुका होणार असून त्यावेळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षकांची गरज निर्माण होणार आहे. या महिलांना सर्व प्रकारच्या आव्हानांसाठी तयार करण्यात येणार असून एके-47 सारख्या रायफली चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे.हे हे वाचा - संतापजनक! अगोदर केला 60 वर्षांच्या महिलेचा खून, मग प्रेतावर केला बलात्कार बंगाल निवडणुकीनंतर सुरक्षेची गरज वाढली पश्चिम बंगाल निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर आता इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अधिक सुरक्षा देण्याची गरज निर्माण झाल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाचं मत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना झालेली धक्काबुक्की असो किंवा भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न असो, हिंसाचाराचं प्रमाण वाढत असल्याचे अनुभव आहेत. या कामी महिला सुरक्षारक्षकांची कुमक तयार झाल्याचा फायदा केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना होणार असून त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत होणार आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: CRPF, Security, Women

    पुढील बातम्या