मराठी बातम्या /बातम्या /देश /नववर्षाच्या पहिल्या दिवशी पाककडून सीमेवर गोळीबार; शत्रूला प्रत्युत्तर देताना एका जवान शहीद

नववर्षाच्या पहिल्या दिवशी पाककडून सीमेवर गोळीबार; शत्रूला प्रत्युत्तर देताना एका जवान शहीद

जगभरात नववर्षांच स्वागत केलं जात असताना पाककडून कुरापती सुरू आहेत

जगभरात नववर्षांच स्वागत केलं जात असताना पाककडून कुरापती सुरू आहेत

जगभरात नववर्षांच स्वागत केलं जात असताना पाककडून कुरापती सुरू आहेत

श्रीनगर, 1 जानेवारी : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशीही पाकिस्तानी सैन्याने सीमेवर कारवाया केल्याची माहिती समोर आली आहे. या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात झालेल्या गोळीबारात एका भारतीय जवानाला वीरमरण आलं. नायब सुभेदार रविंदर असं या जवानाचं नाव आहे. भारतीय सैन्यातील या शूर जवानाच्या त्यागानंतर सैनिकांनी पाकिस्तानी जवानांना चोख प्रत्युत्तर दिलं.

शुक्रवारी दुपारी 3. 30 आणि सायंकाळी 5.30 वाजता रजोरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाक सैन्याकडून दोन वेळा युद्धबंदीचं उल्लंघन करण्यात आलं. या गोळीबारात सैन्याचा एक जवान गंभीर जखमी झाला होता. जखमी जवानचे नाव नायब सुभेदार रवींदर असे आहे. मात्र, उपचारादरम्यान रविंदरचं निधन झालं.

त्याचवेळी पाकिस्तानच्या या अमानुषपणाला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, नायब सुभेदार रवींदर हा एक शूर, अत्यंत प्रेरणादायी आणि प्रामाणिक सैनिक होता. त्याच्या सर्वोच्च त्याग आणि कर्तव्याप्रती निष्ठा राखण्यासाठी राष्ट्र नेहमीच त्याचा ऋणी राहिल. नववर्षासाठी देशभरात आनंद साजरा केला जात होता. आधीच गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून कोरोनाच्या महासाथीमुळे लोक हैराण झाले आहे. त्यात नवीन वर्ष संपन्नता घेऊन येईल यासाठी लोक प्रार्थना करीत आहेत.

कधी येणार याची प्रतीक्षा असलेली कोरोना लस(Corona Vaccine)अखेर भारतात उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतासाठी ही दिलासा देणारी बातमी आली आहे. Oxford-AstraZeneca Vaccine ची लस तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळण्यास हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. लशीबद्दल निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने याबाबतचा अहवाल दिला असून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोव्हिशील्ड (Oxford-AstraZeneca Covishield Vaccine) लशीसाठी सशर्त परवानगी द्यायला हरकत नसल्याचं सांगितलं आहे.

First published:
top videos

    Tags: Indian army, Pak