मराठी बातम्या /बातम्या /देश /Fastag चा फंडा, 24 तासात परत आलात तर मिळणार डिस्काऊंट, पण ‘हे’ समजून घेणं महत्त्वाचं

Fastag चा फंडा, 24 तासात परत आलात तर मिळणार डिस्काऊंट, पण ‘हे’ समजून घेणं महत्त्वाचं

फास्टॅग बंधनकारक होण्यापूर्वी ज्याप्रमाणं 24 तासांत परत यायचं असेल तर टोलमध्ये सवलत मिळत होती, तशीच सवलत आता फास्टॅग पद्धतीतही मिळते. मात्र ती समजून घेणं गरजेचं असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

फास्टॅग बंधनकारक होण्यापूर्वी ज्याप्रमाणं 24 तासांत परत यायचं असेल तर टोलमध्ये सवलत मिळत होती, तशीच सवलत आता फास्टॅग पद्धतीतही मिळते. मात्र ती समजून घेणं गरजेचं असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

फास्टॅग बंधनकारक होण्यापूर्वी ज्याप्रमाणं 24 तासांत परत यायचं असेल तर टोलमध्ये सवलत मिळत होती, तशीच सवलत आता फास्टॅग पद्धतीतही मिळते. मात्र ती समजून घेणं गरजेचं असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

मुंबई, 5 जुलै : कुठल्याही महामार्गावरून प्रवास करत असताना जर 24 तासात परत यायचं (Return within 24 hours) असेल, तर वाहनधारकांना टोलमध्ये सवलत (Discount) मिळते. फास्टॅग (Fastag) वापरणाऱ्या अनेकांना याची तांत्रिक माहिती (Technical Information) नसल्यामुळे अनेकदा गैरसमजांना आमंत्रण मिळतं. फास्टॅग बंधनकारक होण्यापूर्वी ज्याप्रमाणं 24 तासांत परत यायचं असेल तर टोलमध्ये सवलत मिळत होती, तशीच सवलत आता फास्टॅग पद्धतीतही मिळते. मात्र ती समजून घेणं गरजेचं असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

पद्धत बदलली, सवलत नव्हे

पूर्वी हायवेवरन प्रवास करताना एखाद्या टोलनाक्यावरून आपण 24 तासांच्या आत परत येणार असू, तर टोलच्या एकूण रकमेवर 25 टक्के सवलत मिळत असे. टोल बंद झाल्यामुळे ही सवलत बंद झाली, असं अनेकांना वाटतं. मात्र उलट ही सवलत बंद झाली नसून आता 25 टक्क्यांऐवजी 50 टक्के सवलत मिळते. प्रत्यक्षात जेव्हा वाहन टोलनाक्यावरून पास होतं, तेव्हा फास्टॅग खात्यातून रक्कम वजा होता. 24 तासांच्या पुन्हा त्याच टोलनाक्यावरून परतीच्य मार्गे आलं तरी पूर्ण रक्कम खात्यातून कापली जाते. मात्र काही तासांत सर्व्हरला याची सूचना जाते आणि सवलतीची रक्कम पुन्हा एकदा वाहनधारकाच्या खात्यात जमा होते.

अशी चालते यंत्रणा

एखादं वाहन जेव्हा टोलनाक्यावर जातं, तेव्हा तिथं आकारल्या जाणाऱ्या टोलची पूर्ण रक्कम फास्टॅग खात्यातून कापली जाते. 24 तासांच्या आत जरी परत आलं, तरी फास्टॅगच्या यंत्रणेला याचा फिडबॅक नसल्याने पूर्ण रक्कमच कापली जाते. मात्र फास्टॅग सर्व्हरवर एक वाहन एका टोलनाक्यावरून जाऊन 24 तासांच्या आत परत आल्याची नोंद होते. त्यानंतर एका वेळच्या टोलच्या 50 टक्के टोलची रक्कम ही संबंधित खात्यावर वळती करण्यात येते.

हे वाचा -'पंतप्रधान मोदी गप्प का?', इंधन दरवाढीवर जुनं ट्विट शेअर करत क्रिकेटपटचा प्रश्न

... तर बँकेशी संपर्क साधा

तुम्ही 24 तासांच्या आत एखाद्या टोलनाक्यावरून परत आलात आणि तरीही तुमच्या खात्यावर सवलीतीची रक्कम जमा होत नसेल, तर तुमच्या संबंधित बँकेला याची कल्पना द्या, असा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. कधीकधी सर्व्हरला प्रोसेसिंग करायला वेळ लागल्याने 10 ते 12 तासही यासाठी लागू शकतात. मात्र बहुतांश वेळा खात्यातून रक्कम कापली गेल्यानंतर दोन ते तीन तासांत ती पुन्हा खात्यात जमा होते.

First published:

Tags: Discount offer, Fastag, Toll naka