जाहिरात
मराठी बातम्या / देश / Farmers Protest : 26 जानेवारीच्या हिंसाचारप्रकरणी आणखी तिघांना अटक

Farmers Protest : 26 जानेवारीच्या हिंसाचारप्रकरणी आणखी तिघांना अटक

Farmers Protest : 26 जानेवारीच्या हिंसाचारप्रकरणी आणखी तिघांना अटक

शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी (Farmers Protest) झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आणखी तीन आरोपींना अटक केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी (Farmers Protest) झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे तिन्ही आरोप बुराडी आणि लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारात सामील होते. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणाच्या तपासासाठी नेमणूक करण्यात आलेल्या SIT ने या तिघांना अटक केली आहे. याआधीही एसआयटीने दिल्ली हिंसाचार प्रकरणी दोन जणांना अटक केली होती. आता लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 5 आरोपींना अटक झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या एसआयटीने 25 संशयीत आरोपींचं चित्र प्रसिद्ध केलं होतं. या फोटोंमध्ये दीप सिद्धूचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. देशभरात चक्काजाम आंदोलन केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधकांकडून देशभरात आज चक्काजाम आंदोलन सुरू आहे. त्यामुळे देशाच्या प्रत्येक शहरांमध्ये आणि मोठ्या महामार्गांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी सांगितलं की चक्काजाम आंदोलन शांततापूर्ण मार्गाने होणार आहे. दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाजीपूर बॉर्डरवर हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसह देशभरातले शेतकरी आंदोलन करत आहेत. 26 जानेवारीला या आंदोलनादरम्यान झालेल्या ट्रॅक्टर रॅलीवेळी हिसांचार झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात