'खलिस्तानवाद्यांना 26 जानेवारीला दुसरं जालियनवाला घडवायचं होतं; पोलिसांनी संयमाने डाव परतवला..'

'खलिस्तानवाद्यांना 26 जानेवारीला दुसरं जालियनवाला घडवायचं होतं; पोलिसांनी संयमाने डाव परतवला..'

'26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसक आंदोलनाचं पर्यवसन कदाचित आणखी विपरित स्वरूपात समोर आलं असतं, पण पोलिसांनी अतिशय योग्य पद्धतीने प्रकरण हाताळलं आणि खलिस्तानवाद्यांचा डाव उधळून लावला.' माजी पोलीस अधिकाऱ्यांचं विश्लेषण

  • Share this:

विक्रम सिंग

नवी दिल्ली, 27 जानेवारी : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात (Farm Law) जवळपास गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर काल आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. दरम्यान या रॅलीला हिंसक वळण लागलं. यामध्ये अनेक जवान आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. या घटनेमध्ये शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली होती. परंतु बाहेरील घटकांनी यामध्ये परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे. जमाव मोठ्या प्रमाणात हिंसक झाला होता. यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता देखील निर्माण झाली होती.

कालची घटना ही पोलिसांच्या आणि सुरक्षा दलांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा होऊनही याची माहिती आधी पोलिसांना आणि सुरक्षा दलांना कशी मिळाली नाही हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. त्यांची चिथावणीखोर वक्तव्य देखील या गोष्टीसाठी कारणीभूत आहेत. काळ घटनेच्या ठिकाणी काही समाज विघातक प्रवृत्ती आढळून आल्या होत्या. यामध्ये उमर खालिद सारख्या काही समाज विघातक प्रवृत्ती आढळल्याने याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. कालच्या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची अटक करण्यात आली नाही किंवा कारवाई करण्यात आली नाही हे मला समजत नाही. फौजदारी प्रक्रिया संहिताच्या कलम 107 आणि 116 च्या तिसऱ्या कलमाखाली त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही हे मला समजले नाही.

विशेष म्हणजे दिल्लीत आंदोलकांना परवानगी मिळाल्यास हिंसाचार वाढेल हे अगदी स्पष्ट होते. परंतु पोलिसांनी त्यांना 25 जानेवारीलाच 37 मुद्यांची एक नोटीस दिली होती. पण  इतक्या कमी कालावधीत इतक्या मोठ्या प्रकारच्या आणि लोकसंख्येच्या आंदोलनासाठी नोटीस जारी केली जाऊ शकत नाही. या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांबरोबर पोलीस असायला हवे होते. जेणेकरून या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले नसते. माहिती उशिरा मिळाली असली तरीदेखील लाल किल्ल्यावर आधीच पोलिसांनी छावणीचे स्वरूप तयार करायला हवे होते.

दुसरे जालियनवाला बाग घडले नाही कारण..

पोलिसांनी ज्या पद्धतीने हे आंदोलन आणि प्रकरण हाताळले ते कौतुकास्पद आहे. त्याबद्दल मी दिल्ली पोलिसांचे अभिनंदन करतो. आंदोलनकर्त्यांवर त्यांनी घातक शास्त्रांचा वापर न केल्याबद्दल त्यांच्या कामाचे कौतुक करायलाच हवे. यामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली  दशकानुदशके यावर टीका होत राहिली असती. पाकिस्तानी आणि खलिस्तानींचा हा गेम आहे. 26 जानेवारीची ही घटना त्यांना दुसरी जालियनवाला बागेसारखी करायची होती आणि पोलीस अधीक्षकांना जनरल डायर ठरवायचे होते. परंतु दिल्ली पोलिसांनी अतिशय संयमाने भूमिका घेत अतिशय योग्य पद्धतीने हे प्रकरण हाताळल्याने ते कौतुकास पात्र आहेत. कोणत्याही जाळ्यात न अडकता त्यांनी आपली कामगिरी योग्य पद्धतीने पार पाडली. यामध्ये दिल्ली पोलिसांमधील महिला पोलीस कर्मचारी देखील तितक्याच कौतुकास पात्र आहेत. समोर अतिशय बिकट परिस्थिती असताना देखील त्यांनी आपलं कर्तव्य अतिशय योग्य पद्धतीने पार पाडले.

पुढील दिशा

माझ्या माहितीनुसार दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात 22 प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत आणि गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला आहे. यामध्ये आंदोलकांना ओळखण्यासाठी आणि त्यांची ओळख पटवण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामध्ये facial-recognition software, big data analytics आणि software-driven CCTV footage चा आधार घेतला जाईल. त्यांच्यावर भरघोस बक्षिसे जाहीर करून त्यांचा शोध घेतला जावा. त्यांना चांगला धडा शिकवणे देखील आवश्यक आहे. प्रजासत्ताक दिन आणि तिरंग्याचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.

लखा सिधाना आणि दीप सिद्धू यांनी जी भाषणे दिली आहेत ती सर्व रेकॉर्ड आहेत. सर्व जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करण्यासाठी मोक्का (Maharashtra Control of Organised Crime Act) अंतर्गत तरतूद करणे आवश्यक आहे. कोणताही राजकीय पक्ष अशा प्रकारच्या गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही अथवा मदत करत नाही. प्रशासनाने देखील यामधून धडा घेणं गरजेचे आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये प्रतिबंधात्मक अटक, कारवाई करण्यायोग्य आणि दर्जेदार यंत्रणा उभारणी करायला हवी. याचबरोबर अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये समोरील बाजूस, मागील बाजूस पोलिसांचा पहारा असावा. याचबरोबर साध्या वेशातील पोलीस आंदोलनकर्त्यांमध्ये राहून सुरक्षेची देखरेख करू शकतात.

याचबरोबर जे लोकं या ट्रॅक्टर रॅलीमध्ये अपघात होऊन मृत्यू झालेल्या ड्रायव्हरला शाहिद दर्जा देत आहेत त्यांना प्रश्न विचारायचा आहे. ट्रॅक्टर ड्रायव्हरने ज्या पद्धतीने निष्काळजीपणाने ट्रॅक्टर चालवून स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे त्याचं काय? त्याच्या गुन्हेगारी आणि राष्ट्रविरोधी कृतीला इतकं मोठं करण्याची गरज नाही.

(Disclamer):लेखक निवृत्त पोलीस अधिकारी असून उत्तर प्रदेश पोलीसचे माजी DGP होते. ते नॉयडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती आहेत.लेखातली मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.

First published: January 27, 2021, 5:18 PM IST

ताज्या बातम्या