Home /News /national /

नोकरी गेल्यानंतरही शिक्षकाने सोडली नाही जिद्द; Organic farming करुन मिळवलं लाखोंचं उत्पन्न

नोकरी गेल्यानंतरही शिक्षकाने सोडली नाही जिद्द; Organic farming करुन मिळवलं लाखोंचं उत्पन्न

कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काही जण निराशेच्या गर्तेत गेले तर काहींनी अंधारातूनही वाट शोधत यशाला स्वत:कडे खेचून आणलं.

धोवडा, 05 जानेवारी : कोरोनाच्या (Corona era) या संकटकाळात अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे काहींनी आपल्या गावाची वाट धरत शेती करण्याचा मार्ग निवडला. परंतु यामध्ये काहींना यश आले तर काहींनी हा मार्ग सोडत पुन्हा शहराकडचा रस्ता पकडला. अनेकांनी या काळात शेतीमध्ये (Farming) नवनवीन प्रयोग (Experiments) करत लाखो रुपयांची कमाई केली. राजस्थानच्या एका शिक्षकाने देखील नोकरी गेल्यानंतर आपल्या शेतीमध्ये नवीन प्रायोग करत स्थानिक शेतकऱ्यांपुढे नवीन आदर्श निर्माण केला आहे. या शेतकऱ्याने एका छोट्याशा जमिनीच्या तुकड्यात 33 क्विंटल मक्याचे उत्पादन घेत सर्वांपुढे आदर्श घालून दिला आहे. राजस्थानमधील धोवडा येथील लेखराज सिंह हाड़ा (Lekhraj Singh Hada) यांनी कोरोनाच्या काळात आपली शिक्षकाची नोकरी गेल्यानंतर शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी आपले ऑनलाईन क्लास सुरु ठेवत शेतीमध्ये अनेक प्रयोग करण्यास सुरुवात केली. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल घालण्याची गरज असते. परंतु लेखराज सिंह हाड़ा यांनी ग्रीन हाऊस तयार करण्यासाठी देशी जुगाड करत बांबू आणि तारांच्या मदतीने ग्रीन हाऊस उभे केले. पाच ते सहा लाख रुपये खर्च येणाऱ्या ग्रीन हाउससाठी त्यांनी ही पद्धत वापरत अवघ्या 1 लाख रुपयांमध्ये हे ग्रीन हाऊस उभे केले. यामध्ये त्यांनी ऑरगॅनिक शेती (Organic farming) करत शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण करत परिस्थितीपुढे न झुकण्याचा धडा दिला आहे. हाडा यांनी आपल्या ग्रीनहाऊसमध्ये टोमॅटो, वांगी आणि गव्हाची शेती देखील केली आहे. त्याचबरोबर पेरू, मेथी, वाटाणा, पालक आणि ढोबळी मिरचीची देखील लागवड केली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ही पिके पूर्णपणे ऑरगॅनिक पद्धतीने लावली असून यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला नाही. त्यांच्याकडे पेरूची झाडेदेखील असून यासाठी देखील ते पूर्णपणे जैविक खाद्य वापरत आहेत. यासाठी ते धोत्रा, गोमूत्र, मोह, केशर,कडुनिंब इत्यादींचे मिश्रण करुन सेंद्रिय औषध तयार करत आहेत. 100 रुपयांत 30 लिटर गोमूत्र विकत घेतात    आपल्या शेतीमध्ये जैविक खत तयार करण्यासाठी हाडा बाहेरून गोमूत्र विकत घेतात. यासाठी ते प्रति 30 लिटर गोमुत्रासाठी 100 रुपये खर्च करत आहेत. जैवीक खत तयार करून ते आपल्या शेतीमध्ये वापरतात. त्याचबरोबर गोवंश टिकवण्यासाठी देखील ते कार्यरत असून या गोमूत्र खरेदीच्या माध्यमातून ते आपला सहभाग यामधे नोंदवत आहेत. याचबरोबर त्यांनी संपूर्णपणे ऑरगॅनिक उसाची शेती देखील केली असून शेणखत 5000 लीटर वेस्ट डी कंपोजरच्या मदतीने उसाची लागवड केली आहे. यांचबरोबर या तयार होणाऱ्या उसापासून ते गूळ तयार करणार असून यामध्ये काजू, बदाम आणि शेंगदाण्याचा वापर करून याची ब्रॅण्डिंग करून ते स्वतः विक्री करणार आहेत. यामुळं त्यांचा मोठा फायदा होणार असून त्यांना नफा देखील जास्त मिळणार आहे. हाडा यांच्या या प्रयोगाचे किस्से दूरपर्यंत पसरले असून त्यांचे प्रयोग पाहण्यासाठी खूप शेतकरी आणि शेतीअधिकारी देखील येत आहेत. याचबरोबर शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक पदधतीने शेती करून सेंद्रिय खतांचा आणि केमिकलचा वापर कमी करण्याचे आवाहन देखील त्यांनी केलं आहे. सेंद्रीय खतांचा वापर शरीरासाठी हानिकारक असून त्यांनी याचा कमी वापर किंवा वापर टाळण्याचे देखील आवाहन केलं आहे.
Published by:Amruta Abhyankar
First published:

Tags: Covid19, Farmer

पुढील बातम्या