निर्भया प्रकरणात फाशी दिलेल्या चारही गुन्हेगाराचं कुटुंब भोगत आहेत 'जन्मठेप'

निर्भया प्रकरणात फाशी दिलेल्या चारही गुन्हेगाराचं कुटुंब भोगत आहेत 'जन्मठेप'

मार्चमध्ये फासावर लटकवण्यात आलेले विनय शर्मा, अक्षय ठाकुर, पवन गुप्ता आणि मुकेश सिंह यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य बदललं आहे. निर्भयाच्या दोषींना 20 मार्च रोजी फासावर लटकवण्यात आलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 डिसेंबर : काही वर्षांपूर्वी नवी दिल्लीत चालत्या बसमधून एक निष्पाप तरुणीवर अत्यंत क्रूर पद्धतीने सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आला. यानंतर उपचारादरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला. हा गुन्हा इतका भीषण होता की नागरिकांचा असंतोष उफाळून आला. ठिकठिकाणी निर्भयाच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षेची मागणी केली जाऊ लागली. यानंतर काही महिन्यांपूर्वी निर्भया प्रकरणातील (Delhi Nirbhaya Case) गुन्हेगारांना फासावर लटकवण्यात आलं. त्यांच्या नंतर या गुन्हेगारांच्या कुटुंबीयांचं आयुष्य सोपं राहिलं नाही. मार्चमध्ये फासावर लटकवण्यात आलेले विनय शर्मा, अक्षय ठाकुर, पवन गुप्ता आणि मुकेश सिंह यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य बदललं आहे. निर्भयाच्या दोषींना 20 मार्च रोजी फासावर लटकवण्यात आलं होतं.

विनयच्या वडिलांची नोकरी सुटली

दोषींना फाशी दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसमोर गंभीर समस्या उभ्या राहिल्या आहेत. विनय शर्माच्या वडिलांची नोकरी सुटली आहे. तर त्याच्या बहिणींची तब्येत गंभीर आहे. शिवाय त्याच्या कुटुंबीयाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.

मुकेशच्या आई-वडिलांनी घर सोडलं

मुकेशचे वडिल व आईने मार्च महिन्यात दिल्लीतील आर के पुरम येथील रविदार कॅम्पमधील आपलं घर सोडलं आहे. पवन गुप्ताच्या वडिलांचा काहीच पत्ता नाही. अक्षय ठाकूरचे आई-वडिल आता आर के पुरममध्ये दुसऱ्या जागी राहतात. शेजारच्यांनी सांगितलं की ते कोणाच्याही संपर्कात नाही.

विनयच्या घरात खायला पुरेसं अन्न नाही

रविदास कॅम्पमध्ये शर्माचे आई-वडिल राहतात. तर त्याच्या दोन्ही बहिणी उत्तर प्रदेशातील एका गावात राहतात. शर्माची 21 वर्षीय बहिणीने सांगितलं की, लॉकडाऊनदरम्यान परिस्थिती अधिक खराब झाली. तिच्या वडिलांची नोकरी गेली. जोपर्यंत विनय तुरुंगात होता, तोपर्यंत आमच्यासाठी सर्व ठीक होतं. त्याला भेटत होतो आणि सर्व ठीक होईल अशी अपेक्षा होती. मात्र जेव्हा माझ्या वडिलांची नोकरी गेली त्यानंतर कुटुंब विस्कळीत झालं. तिने सांगितलं की, अनेक दिवस तर घरात शिजवायला काही अन्नच शिल्लक नव्हतं. मी दिल्लीत उपचारासाठी आले होते. मला मधूमेह आणि मी इन्शुलिनचं इंजेक्शन घेते. यानंतर तिने सांगितलं की, गुप्ता कुटुंबीयांशी तिचा काहीही संबंध नाही.

पवन गुप्ताच्या पालकांनी घर सोडलं

रविदास कॅम्पमध्ये गुप्ता कुटुंबीयांच्या शेजारच्यांनी सांगितंल की, पवन गुप्ताचे आई-वडील कोणाच्याही फास संपर्कात नाहीत. शेजारच्यांनी दावा केला आहे की, या भागात राहणारा मुकेश सिंह यांचं कुटुंबीय येथे परत कधीचं आले नाही.

Published by: Meenal Gangurde
First published: December 16, 2020, 4:05 PM IST

ताज्या बातम्या