भोपाळ, 15 मार्च : आज मला स्ट्रेचरवरुन ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यात आलं. तेव्हा माझी बहीण, आणि मित्र माझ्याकडे पाहत होते. ते प्रार्थना करीत होते. त्यांच्या मागे बरंच लांब मी पाहिलं की, अलका मला लांबूनच पाहतेय. एक शेवटच्या वेळी तिला पाहायचं होतं, जसं मी तिच्या जवळ गेलो तिने मला घट्ट मिठी मारली. 14 मार्च रोजी 48 व्या जन्मदिवशी मुंबईतील रुग्णालयात (Mumbai) शस्त्रक्रियेनंतर अलकाचं नाव आणि ओळख बदलली आणि ती अस्तित्व म्हणून नावारुपास आली. आता नव्या आयुष्याची सुरुवात करीत असल्याचं अस्तित्व सांगतो. अस्तित्वने सांगितलं की, हा माझा पुनर्जन्म आहे. यासाठी मी जेंडर चेंज करण्यासाठी आपल्या जन्माची तारीख 14 मार्चची निवड केली. अस्तित्वने सांगितलं की, आपली कहाणी सांगण्यासाठी त्याने सोशल मीडियाची मदत घेतली. आतापर्यंत इतक्या वर्षांत त्याला ताई, मॅडम सारख्या सन्मानजनक शब्दातून जखमा मिळाल्या. अस्तित्वने सांगितलं की, अलकाच्या रुपात लहानपणापासून स्त्री म्हणून वागत असला तरी तो आपल्या नैसर्गित शरीराचा स्वीकार करू शकला नाही. जेव्हा कुटुंबातील लोकांना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला तर त्यांनी साथ तर दिली, मात्र लोक काय म्हणतील या विचाराने गप्प राहायला सांगितलं. अस्तित्वचा पोशाख तर मुलांसारखा होता, मात्र समाज तिला स्त्री म्हणूनच ओळखत होतं. कोरोना काळात घेतला निर्णय… अस्तित्वने सांगितलं की, स्वत:ची समजूत घातल्यानंतरही 30 वर्षे असेच गेले. मात्र कोरोनाकाळात जेव्हा जवळच्यांना डोळ्यासमोर जाताना पाहिलं तेव्हा याची जाणीव झाली. आपण उद्याचे प्लान करतो, मात्र आयुष्य एका क्षणात संपून जातं. यासाठी आयुष्याच्या उत्तरार्धात पोहोचल्यानंतरदेकील मी सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. आयुष्याची पहिली 20 वर्षे निघून गेल्यानंतरही मी स्वत:ला त्या रूपात स्वीकारू शकत नव्हते. माझा पोशाख..चालणं-फिरणं…उठणं-बसणं..सर्व आपोआप बदलत गेलं. जग काहीही म्हणू दे वा ऐकू दे..मी मात्र माझं अंतर्मन जे सांगत होतं, ते ऐकत होतो. कारण माझं अस्तित्व वेगळच आहे. माझं शरीर कोणाचं का असेना, मात्र माझं मन पुरुषाचं आहे. आणि हेच सत्य आहे. हे ही वाचा- फक्त 4 हजार देऊन भारतात घुसले दहशतवादी; लॉकडाऊनमधील धक्कादायक प्रकार मला माझ्या अस्तित्वाला न्याय द्यायचा होता. यासाठी मी जेंडर अफर्मेशन सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. 11 नोव्हेंबर 2021..हा तो दिवस आहे, जेव्हा डॉक्टरांनी माझं नाव अस्तित्व सोनीच्या पुढे पुरुष लिहिलं. कशी असते शस्त्रक्रिया… महिलांपासून पुरुष होण्याच्या प्रक्रियेअंतर्गत मॅस्टेक्टॉमी असे. ज्यात स्तन हटवले जातात. हिस्टेरेक्टॉमी म्हणजे युटरेस रिमूव्हल आमि फॅलोप्लास्टी म्हणजे पुरुष जननेंद्रिय निर्माण केलं जातं. दीड महिने बेड रेस्ट करावी लागते. इंदूर शहरात 15 महिला पुरुष झाल्या आहेत. सर्जरीचा खर्च 10 ते 20 लाखांपर्यंत येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.