अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत अमेरिकेची प्रथम महिला मेलानिया ट्रम्प, मुलगी इवांका ट्रम्प आणि जावई जेरेड कुशनरसोबतच अनेक अधिकारीही उपस्थित असणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते सात आश्चर्यांपैकी एक म्हणजेच ताज महलला देखिल भेट देणार आहे. ताज महल आणि डोनाल्ड ट्रम्प यांच जुनं नातं आहे. आश्चर्य वाटलं ना ऐकून पण हे खरं आहे. एकेकाळी डोनाल्ड ट्रम्प यांनीही ताज महल बांधला होता. पण असं काही घडलं की ज्यामुळे 26 वर्षांनंतर त्यांना ताज महल विकावा लागला.
अमेरिकामधील न्यूजर्सी राज्यातील अटलांटीक शहरात एक ‘हार्ड रॉक हॉटेल अॅण्ड कसिनो अटलांटीक सिटी’ या नावाचं एक कसीनो आणि हॉटेल आहे. ज्याला ट्रम्प ताज महाल या नावानेही ओळखला जातं. हा कसीनो अमेरिकेमधील प्रसिद्ध कसीनोमधील एक आहे. 1990मध्ये हा कसीनो 100 करोड डॉलर खर्च करून बनवण्यात आला होता.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प एक मोठे बिजनेमन आहेत. त्यांना त्यांच्या वडिलांकडून वारसा हक्कात प्रचंड मोठं साम्राज्य मिळालं होतं. 2 एप्रिल 1990मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा हा कसीनो तयार झाला होता. तेव्हा तो जगातील सर्वात मोठा कसीनो होता. या कसीनोच उद्घाटनही डोनाल्ड ट्रम्प यांनीच केलं होतं. आणि या कसीनोच नाव ‘ट्रम्प ताज महल’ असं होतं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीने 24 वर्ष हा कसीनो व्यवस्थितपणे चालवलं. मात्र 2014 मध्ये काही अडचणी समोर यायला सुरुवात झाली. अखेर 2016 ला ट्रम्प ताज महल हा कसीनो विकण्याचा निर्णय कंपनीने घेतला. त्यानंतर 1 मो 2017 ला सेमिनोल ट्राइब ऑफ फ्लोरिडाने हार्ड रॉक इंटरनॅशनल ब्रँडच्या अंतर्गत हा कसीनो पुन्हा सुरू करण्यात आला.
हा कसीनो आकाराने अमेरिकेतील सर्वात मोठा कसीनो आहे. जवळपास 15 हजार स्क्वेअर मीटरच्या जागेत असलेल्या या कसीनोमध्ये 1900 हून अधिक खोल्या आहेत. ही इमारत वेगळ्या पद्धतीने बनण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाच्या या इमारतीवर निळ्या आणि लाल रंगाचा वापर करण्यात आला आहे.
हा ‘ट्रम्प ताज महल’ कसीनो आता जरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कडे नसला तरी ट्रम्पच्या हा ताजमहल अमेरिकेची जनता ट्रम्प यांच्या नावानेच ओळखते. यावरून एक गोष्ट मात्र सिद्ध होते की, ट्रम्प यांना भारतातील ताज महलने नक्कीच भुरळ घातली आहे.