Home /News /national /

Domestic Violence: पतीने मारहाण करणे योग्यच; घरगुती हिंसाचाराबाबत महिलांची धक्कादायक मते

Domestic Violence: पतीने मारहाण करणे योग्यच; घरगुती हिंसाचाराबाबत महिलांची धक्कादायक मते

Domestic Violence,National Family Health Survey,NFHS : केंद्रशासित प्रदेशांसह 14 राज्यांमधील सुमारे 30 टक्के महिलांनी काही विशिष्ट परिस्थितीत त्यांना पतीकडून केली जाणारी मारहाण योग्य असल्याचे म्हटले आहे. अहवालानुसार, तीन राज्यांतील 75 टक्क्यांहून अधिक महिलांनी पतीकडून होणाऱ्या घरगुती हिंसाचाराला समर्थनच दिलं आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या (National Family Health Survey) एका सर्वेक्षणात घरगुती हिंसाचाराबाबत (Domestic Violence) धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहे. NFHS सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, केंद्रशासित प्रदेशांसह 14 राज्यांमधील सुमारे 30 टक्के महिलांनी काही विशिष्ट परिस्थितीत त्यांना पतीकडून केली जाणारी मारहाण योग्य असल्याचे म्हटले आहे. अहवालानुसार, तीन राज्यांतील 75 टक्क्यांहून अधिक महिलांनी पतीकडून होणाऱ्या घरगुती हिंसाचाराला समर्थनच दिलं आहे. NFHS-5 डेटावरून असे दिसून आले की, या तीन राज्यांमध्ये, तेलंगणातील 84 टक्के, आंध्र प्रदेशात 84 टक्के आणि कर्नाटकातील 77 टक्क्यांहून अधिक महिलांना असे वाटले की, त्यांच्या पतींनी त्यांना मारहाण करणे योग्य आहे. NFHS ने आपल्या सर्वेक्षणात महिलांना असा प्रश्न विचारला होता की, एखाद्या पतीने त्याच्या पत्नीला मारणे योग्य आहे की नाही? या राज्यांतील महिलांची टक्केवारी जर आपण इतर राज्यांच्या आकडेवारीत बोललो, तर मणिपूरमधील 66 टक्के महिला, केरळमधील 52 टक्के, जम्मू-काश्मीरमधील 49 टक्के महिलांना पुरुषांना त्यांच्या पत्नीला मारहाण करणे योग्य वाटते. दुसरीकडे, महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर येथील 44 टक्के महिलांना तर पश्चिम बंगालमधील 42 टक्के महिलांना नवऱ्याने मारहाण करणे योग्य वाटते. संपूर्ण अहवालाच्या विश्लेषणातून घरगुती हिंसाचारावर हा एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. हे वाचा - Hair Problems: केसांच्या अनेक समस्यांवर तांदळाचे पीठ आहे गुणकारी, या 3 पद्धतींनी करा उपयोग या परिस्थितीत मारणे योग्य वरील प्रश्नाला उत्तर देताना, केंद्रशासित प्रदेशांसह 14 राज्यांतील 30 टक्के महिलांनी त्यांच्या पतींनी केलेल्या मारहाणीचे समर्थन केले. घराकडे किंवा मुलांकडे दुर्लक्ष करणे, सासरच्या लोकांचा अनादर करणे, विनाकारण संशय घेणे, वाद घालणे, लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देणे, पतीला न सांगता बाहेर जाणे, घराकडे दुर्लक्ष करणे, चांगले जेवण न करणे, या कारणांवरून पतीने मारहाण करणं योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे वाचा - कोरोना महासाथीत वृद्ध लोकांच्या मानसिक आरोग्यावर झाला असा परिणाम – नवे संशोधन येथील मारहाणीचे मुख्य कारण - हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, गुजरात, नागालँड, गोवा, बिहार, कर्नाटक, आसाम, महाराष्ट्र, तेलंगणा, नागालँड आणि पश्चिम बंगालमध्ये सासरच्या लोकांचा अनादर हे पुरुषांकडून महिलांना मारहाण करण्याचे मुख्य कारण आहे. पतीने उचललेले हे पाऊल योग्य नसल्याचे हिमाचल प्रदेशमधील महिलांना वाटते. कारण, येथील सर्वेक्षणात सर्वात कमी 14.8 टक्के महिलांनी या गोष्टीला समर्थन दर्शवले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Domestic flight, Women empowerment

    पुढील बातम्या