गुलशन कश्यप, प्रतिनिधी जमुई, 18 जुलै : भारतीय संस्कृतीनुसार, जर तुम्ही कुणाच्या गावात किंवा घरी गेले तर त्याठिकाणी चहा आणि पाणी देऊन तुमचे स्वागत केले जाते. मात्र, बिहार राज्यात एक असे गाव आहे, जिथे लोक हातात लाठ्या घेतलेल्या अवस्थेत मिळतील. मात्र, तुम्ही घाबरुन जाण्याचे कारण नाही. ही लाठी तुमच्यासाठी नाही. हा प्रकार नेमका काय आहे, हे जाणून घेऊयात. या गावात लाठीविना लोक आपल्या घरातून बाहेर निघत नाही. संध्याकाळ झाली की, लोक आपल्या घराच्या दरवाजाबाहेर लाठी घेऊन बसतात. लहान मुले आणि गावातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी असे केले जात आहे. हा प्रकार जमुई जिल्ह्याच्या जोगाझिंगोई गावातील आहे.
कुत्र्यांच्या हैदोसमुळे लोक असे करत आहेत. गावातील लोक सांगतात की, गावातील दोन मुले सातत्याने लोकांवर हल्ले करत आहेत. आतापर्यंत त्या कुत्र्यांनी तब्बल 40 पेक्षा अधिक जणांना चावा घेतला आहे. कोणतीही व्यक्ती जेव्हा घरातून बाहेर निघते त्यावेळी हा कुत्रा त्यावर हल्ला करतो तसेच चावा घेतो. यामुळे गावातील लोक घाबरलेले आहेत. कुत्र्याने चावा घेतल्याच्या इतक्या घटना समोर आल्यानंतर आता लोक टीम बनवूनच घरातून बाहेर पडत आहेत. दरम्यान, आतापर्यंत लोक या कुत्र्याला ताब्यात घेऊ शकले नाहीत. त्यामुळे कुत्र्याने चावा घेतल्याच्या या घटनाही कमी झालेल्या नाहीत.