चंडीगड, 17 डिसेंबर : नवीन कृषी कायद्याविरोधात (New Farm Law) आंदोलनादरम्यान संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी स्वत:ला गोळी मारुन आत्महत्या केली. यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, येथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. यावेळी 1996 पासून त्यांचे शिष्य गुलाब सिंह म्हणाले की, बाबा यांचा जन्म जगराव पंजाबमध्ये झाला. ते सहा बहिणींमध्ये एकटे भाऊ होते. त्यांच्याकडून मी कीर्तनाचं ज्ञान घेतलं. त्यांच्यावर सिव्हील रुग्णालयात पोस्टमार्टम केलं जात आहे. यामुळे अनेक गोष्टी समोर येतील.
गुलाबसिंग म्हणतात, 'जेव्हा ही घटना घडली तेव्हा भाऊ मंजीत सिंग त्यांच्या जवळच होते. ते बाबा रामसिंगाचे हजुरी सेवक आहे. ते बाबाजींबरोबर नेहमीच असतात. गुलाबसिंग म्हणाले, 8 आणि 9 डिसेंबर रोजी बाबाजींनी करनालमध्ये अरदास समागम आयोजित केला होता, ज्यामध्ये बरेच लोक सामील झाले होते. शेतकरी चळवळीत सामील झालेल्या सर्व शेतकर्यांनी शांततेत घरी पोचलावे, अशी प्रार्थना बाबाजींनी केली होती. 9 डिसेंबर रोजी बाबाजींनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात 5 लाख रुपये दिले व त्याच्यात सामील झाले. यानंतर बाबाजींनी त्यांना गरम कपडे दिले होते. ते दररोज आपल्या लोकांसह तेथे जात. ते रोज डायरी लिहायचे. ते म्हणत होते, की मला शेतकऱ्यांचं हे दुःख पाहवत नाही. गुलाबसिंग यांनी संत बाबा रामसिंग यांच्यासमवेत एक छायाचित्रही शेअर केले आहे.
बाबा हुतात्मा झाले
गुलाबसिंग म्हणाले, 'बाबा रामसिंह पुन्हा शेतकऱ्यांच्या आंदोलनात आले होते. येथे त्यांनी आपल्या सेवेकऱ्यांना स्टेजवर जाण्यास सांगितले. यावेळी सर्वजण येथून निघून गेले. बाबा रामसिंग गाडीत बसले होते. मग त्यांनी एक चिठ्ठी लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, शेतकरी चळवळीमुळे दु:खी झालेल्या अनेक बांधवांनी नोकर्या सोडल्या. अशा परिस्थितीत मी माझे शरीर समर्पित करीत आहे. कारमध्ये पिस्तूल होती. ती घेऊन त्यांनी स्वत:वर गोळी चालवली. त्यांनी शेतकरी चळवळीत हुतात्मा झाले.