रायपूर, 29 एप्रिल : छत्तीसगडची (Chhattisgarh) राजधानी रायपूरमध्ये (Raipur) डॉक्टरांनी 72 वर्षांच्या महिलेला जिवंत असताना मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीय महिलेला घेऊन स्मशानभूमीत पोहोचले. या महिलेला अंत्यविधीसाठी रचलेल्या सरणावर ठेवत असताना ती श्वास घेत असल्याचे जाणवले त्यामुळे सर्वजण चक्रावले. कुटुंबीयांनी ताबडतोब तिला घेऊन रुग्णालयात दाखल केले. परंतु, तोपर्यंत या महिलेचा मृत्यू झाला होता. पहिल्यांदाच डॉक्टरांनी योग्य तपासणी केली असती तर वृद्ध महिलेचे कदाचित जीव वाचला असता, असे म्हणत कुटुंबीयांनी डॉक्टरांवर आरोप केला आहे.
छत्तीसगडच्या राजधानीतील सर्वात मोठ्या मेकहारा रुग्णालयात (Mekahara Hospital Raipur) ही घटना घडली. बुधवारी दुपारी जेवताना अचानक बेशुद्ध पडलेल्या 72 वर्षीय लक्ष्मी अग्रवाल यांना त्यांच्या नातेवाईकांनी तत्काळ मेकहारा रुग्णालयात आणले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतर महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेतून गोकुळनगर येथील स्मशानभूमीत नेण्यात आला आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र, जेव्हा महिलेला उचलून चितेवर ठेवण्यात आले, तेव्हा त्यांच्या शरिराच्या काही हालचाली होत असल्याचे दिसून आले.
हे वाचा - शेतकऱ्याच्या प्रश्नावर भडकले मंत्रीमहोदय, ‘यापेक्षा तुम्ही मरा!’- दिलं संतापजनक उत्तर!
बारकाईने पाहिले तर त्यांच्या नाडीची हालचाल होत होती आणि श्वासही थोडासा चालू होता. हा प्रकार पाहुन उपस्थित सर्वच चक्रावले. कुटुंबीयांनी त्यांना परत ताबडतोब रुग्णालयात नले. पुन्हा डॉक्टरांना दाखवले गेले, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी काही तासातच एकाच रुग्णाला दोनदा मृत घोषित केल्याचा प्रकार घडला.
डॉक्टरांनी केलेल्या या प्रकारामुळे त्या महिलेच्या कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डॉक्टरांनी जेव्हा पहिल्यांदा महिलेला मृत घोषित करण्यात आले तेव्हा ती जिवंत होती. त्यावेळी डॉक्टरांनी तिच्यावर योग्य उपचार केले असते, तर कदाचित ती जगली असती, असे त्यांचे म्हणणे आहे.
हे वाचा - काँग्रेसचे नेते राजीव सातव यांची कोरोनामुळे प्रकृती खालावली, मुंबईला हलवणार!
घडलेल्या या प्रकारावरून सोशल मीडियावरही काही लोकांनी रुग्णालयाच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली. बहुतेक रुग्णालयांमध्ये अशीच परिस्थिती असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. डॉक्टर रुग्णांकडे लक्ष देत नाहीत. तथापि, काही लोक असेही म्हणतात की, कधीकधी असे होते की पूर्णपणे मेल्यानंतरही 'व्हाइटल ए-4 गन' पुन्हा कार्य करण्यास सुरुवात करते, परंतु हे केवळ थोड्या काळासाठीच घडते. या प्रकरणात कदाचित हेच घडले असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chattisgarh, Corona virus in india