जाहिरात
मराठी बातम्या / देश / डॉक्टरचा बेजबाबदारपणा? लहान मुलाच्या जीभेच्याऐवजी केले प्रायव्हेट पार्टचे ऑपरेशन

डॉक्टरचा बेजबाबदारपणा? लहान मुलाच्या जीभेच्याऐवजी केले प्रायव्हेट पार्टचे ऑपरेशन

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

हे प्रकरण दाबले जावे, यासाठी आर्थिक व्यवहाराचीही चर्चा होत आहे.

  • -MIN READ Local18 Bareilly,Uttar Pradesh
  • Last Updated :

चितरंजन सिंह, प्रतिनिधी बरेली, 25 जून : डॉक्टरने अडीच वर्षांच्या चिमुरड्याचा जीभेची ऑपरेशन करण्याऐवजी त्याच्या प्रायव्हेट पार्टचे ऑपरेशन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. उत्तरप्रदेश राज्यातील बरेलीतील एका रुग्णालयात डॉक्टरच्या बेजबाबदार पणामुळे हा धक्कादायक प्रकार घडला. याबाबतची माहिती घरच्यांना कळताच एकच गोंधळ उडाला. तर घटनेची माहिती मिळताच हिंदू संघटनेचे नेते रुग्णालयात पोहोचले. या घटनेनंतर डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. डॉक्टरांनी जाणूनबुजून हिंदू मुलाची सुंता (खतना) केल्याचा आरोप केला जात आहे. तसेच कुटुंबीयांवर तडजोड करण्यासाठी दबाव टाकला जात आहे.

News18लोकमत
News18लोकमत

सम्राट असे या अडीच वर्षांच्या चिमुरड्याचे नाव आहे. तो संजय नगर परिसरातील रहिवासी असलेल्या हरीमोहन यादव यांचा मुलगा आहे. सम्राट याला बोलता येत नव्हते. त्यामुळे कुणीतरी त्याच्या घरच्यांना सांगितले की, त्याच्या जीभेचे ऑपरेशन कराल, तर तो बरा होईल. यानंतर त्यांनी डेलापीर येथील डॉ. एम खान हॉस्पिटलमध्ये डॉ. मो. जावेद खान यांना दाखवले. असा आरोप आहे की, डॉ. जावेद खान यांनी त्यांच्या मुलाचे जीभेचे ऑपरेशन करण्याऐवजी प्रायव्हेट पार्टचे ऑपरेशन केले. तर या घटनेची माहिती मिळताच हिंदू जागरण मंचचे नेता घटनास्थळी पोहोचले. डॉक्टरांनी हे कृत्य जाणीवपूर्वक केल्याचा आरोप हरिमोहन यांनी केला आहे. हॉस्पिटले लोक त्यांच्यावर तडजोड करण्यासाठी दबाव टाकत आहेत. डॉक्टरांनी माझ्या मुलाला हिंदू धर्मातून मुसलमान बनवले. आम्हाला मुलाचे जीभेचे ऑपरेशन करायचे होते. पण आम्हाला विचारले नाही किंवा काहीही सांगितले गेले नाही. डॉक्टर जावेद खान म्हणाले की, त्यांच्याजवळ या मुलाला आणण्यात आले. या मुलाला लघवीचा त्रास होत आहे, असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांना उपचाराची प्रक्रियाही मी सांगितली. नातेवाईकांनी मला ऑपरेशनचा खर्च विचारला आणि दुसऱ्या दिवसाची तारीख घेतली. त्यानंतरच मी हे ऑपरेशन केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी शहराचे एसपी राहुल भाटी सांगतात की, कुटुंबीय त्यांच्या अडीच वर्षाच्या चिमुरड्याच्या जिभेचे ऑपरेशन करण्यासाठी बारादरी पोलीस स्टेशन हद्दीतील डॉ. एम. खान हॉस्पिटलमध्ये आले होते. डॉक्टरांनी जिभेचे ऑपरेशन करण्याऐवजी अडीच वर्षांच्या चिमुरड्याच्या प्रायव्हेट पार्टचे ऑपरेशन केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या संदर्भात तक्रार दाखल झाली आहे. यानंतर आता याप्रकरणी चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तर हे प्रकरण दाबले जावे, यासाठी आर्थिक व्यवहाराचीही चर्चा होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात